Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर 700 हून अधिक नगरसेवकपदाच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. ज्याठिकाणी निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. राज्यातील उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित पत्रकात काय? (Revised leaflet of the State Election Commission)
राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ–20254/स.नि.का./न.प./प्र.क्र.94/का.6, दिनांक 29/11/2025 नुसार, न्यायालयीन अपील व इतर कारणास्तव प्रभावित नगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी खालील सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जात आहे.
सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025-
क्र. निवडणुकीचा टप्पा तारीख /वेळ
1. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 04/12/20252. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस 10/12/2025 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)3. आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्हे वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रकाशन 11/12/20254. मतदानाचा दिवस (आवश्यक असल्यास) 20/12/2025 (स. 7:30 ते सं. 5:30)5. मतमोजणी व निकाल जाहीर 21/12/2025 (सकाळी 10:00 पासून)6. राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख 23/12/2025 पूर्वी कलम 19 मधील तरतुदीनुसार...
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
(सुरेश काकाणी)सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकीचा सावळागोंधळ
नगराध्यक्षपद-
घोषणा288
बिनविरोध3
स्थगित22
उद्या मतदान253
22 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती- (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed)
अमरावती विभाग-बाळापूरअंजनगाव सुर्जीयवतमाळदेऊळगाव राजावाशिम
कोकण विभाग-अंबरनाथ
छ.संभाजीनगर विभाग-फुलंब्री धर्माबादमुखेडरेणापूरवसमत
नागपूर विभाग-घुग्घूसदेवळी
नाशिक विभाग-देवळाली-प्रवराकोपरगावपाथर्डीनेवासा
पुणे विभाग-बारामतीफुरसुंगी-उरळी देवाचीमहाबळेश्वरफलटणमंगळवेढाअनगर
नगरसेवकपदाच्याही निवडणुका स्थगित, आतापर्यंत 731 जागी ब्रेक- (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025)
अमरावती- 187
छ.संभाजीनगर- 144
पुणे- 143
नाशिक- 120
कोकण- 69
नागपूर- 68
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप- (Devendra Fadnavis On ECI)
निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.