Vinayak Raut on Narayan Rane : कोकणातून शिवसेना (Shivsena) संपवली, असं वक्तव्य रत्नागिरी-सिंधुदुर्गचे (Ratnagiri Sindhudurg) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. पैशाच्या मस्तीवर ह्या मतदार संघात फक्त 48 हजार मतांनी विजय मिळविला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले,असं समजू नये. राणेंची औकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखली म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. शिवसेना (Shivsena) संपवण्याची भाषा करणाऱ्यांना राजकारणातून संपविण्याची ताकत शिवसैनिकांमध्ये आहे, असं विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
राज्यात जी भाजपा आणि महायुतीची अवस्था झाली आहे ती त्यांनी पाहावी
विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, बकवासगिरीला आम्ही फार महत्व देत नाही. 2005 ला जे भाषण होत तेच 2024 ला सुरु आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याची फार दखल घेत नाही. राज्यात जी भाजपा आणि महायुतीची अवस्था झाली आहे ती त्यांनी पाहावी. आज त्यांच्या पोटात जळफळाट होत आहे. त्यांच्या पोटातील कीड वळवळत आहे. सर्व समाज देशाचं संविधानाच्या संरक्षणासाठी एकटवले आणि मोदींना 240 वर थांबवले आहे. इंडिया आघाडीचा घोडा पुढे सरकवला आहे,त्यामुळे त्यांची वळवळ बाहेर यायला लागली आहे. महायुतीत 100 टक्के बेबनाव आहे. जसं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला कचऱ्यात फेकून देतील ते बघा. शिंदे गटाची सुद्धा फार दयनीय अवस्था होईल. मला त्यांच्यांवर फार भाष्य करायचं नाही, असंही विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे काय म्हणाले होते?
कोकणातून शिवसेना संपवली आहे. मंत्रिपदाचा प्रश्न माझ्या हातात नाही. हा निर्णय वरिष्ठ घेतात. कुणाला मंत्री करावं, कुणाला करू नये, कुणाला कधी मंत्री करावं हा वरिष्ठांचा निर्णय असतो. हा प्रश्न संपलेला नाही. केव्हाही काही होऊ शकतं. मी त्यावर भाष्य करणार नाही. पक्षाला महाराष्ट्र आणि कोकणासाठी काय निर्णय घ्यायचे आहेत ते घेतील, असंही नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या