मुंबई: आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल. अजितत पवार  (Ajit Pawar) हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे  (Vijay Shivtare) यांनी केला. आपली भूमिका एक दोन दिवसात जाहीर करू असंही ते म्हणाले. बारामतीच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील दावा केला. 


मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना बारामतीतील गणितं समजावून सांगितली, त्यामुळे निश्चितपणे चांगला रिझल्ट येईल. एवढंही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाहीत. मी जरी उमेदवार नसलो तरी अजित पवारांचा पराभव होईल. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीवरून आपण युतीधर्म पाळला पाहिजे, आपण युतीमध्ये आहोत. त्यांचं जे काही होईल ते आपसात होईल, त्यामध्ये आपण पडायला नको.  ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री म्हणाले. 


शिवतारेची लायकी काय हे अजित पवारांना दाखवणार


गेल्या निवडणुकीवेळी कोण विजय शिवतारे? त्याची लायकी काय? त्याचा आवाका काय? असं अजित पवार म्हणाले होते. मी एवढा लहान आहे, तर मग अजित पवार आता का तडफडताहेत. मुख्यमंत्र्यांना सांगा, उपमुख्यमंत्र्यांना सांगा असं ते का करतात. हा विजय शिवतारे कोण, त्याचा आवाका काय, त्याची लायकी काय हे अजित पवारांना दाखवतोच.


बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानतंर आता शिंदे गटाच्या विजय शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. त्यानंतर शिवतारे म्हणाले की, "मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे.  मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे."


बारामतीमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची या आधीच उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित असल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: