Varsha Gaikwad on Mahayuti, Mumbai : "महायुतीचे (Mahayuti) सरकार आल्यापासून मुंबईकर खालावत चाललाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईची (Mumbai) अधोगती करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालं. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली.  वरळीमधील हिट आणि रन ही घटना म्हणजे मर्डर आहे. मुंबईमधील सर्व महत्त्वाचे प्रकल्प  गुजरातमध्ये नेले जात आहेत.  मुंबईत प्रचंड खड्डे आहेत. कामं मित्रांना दिली जात आहेत. आपल्याला माहिती अधिक आहे, या गोष्टींवर आम्ही प्रकाश टाकणार आहोत. अधिकाऱ्यांच एक रेट कार्ड आहे, आमदरांचं एक रेट कार्ड आहे", असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) म्हणाल्या. काँग्रेसने सरकार विरोधात पापपत्र प्रकाशित केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही (Balasaheb Thorat) उपस्थित होते. 



आम्ही आता इलेक्शन मोडवर जात आहोत


वर्षा गायकवाड म्हणाल्या,आम्ही आता इलेक्शन मोडवर जात आहोत अस मी जाहीर करते. महायुती सरकार विरोधातील एक रॅप साँग रिलीज केलं. सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय ? असे त्या रॅप साँगचे शब्द आहेत. या सरकारच्या पापांचा घडा भरला आहे. यांनी मुंबईवर फक्त अन्यायच केला आहे. मुंबईच्या संसाधनांची लूट केली आहे; मुंबईकरांची फसवणूक केली. यांच्याकडून मुंबईची अस्मिता, ओळख आणि बंधुभाव मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. शिंदे-फडणवीस-पवार यांच्या ट्रबल इंजिन सरकारच्या पापाचे पत्रक जनतेच्या दरबारात आम्ही मांडत आहोत. आता जनताच त्यांना शिक्षा देईल.


काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'महायुतीचे पाप पत्र'मधील मुद्दे


1. मुंबईकरांचे 2 लाख कोटी लुबाडत , भ्रष्ट-युतीने मंत्रालयाला 'घोटाळा केंद्र' बनवले आहे. 
2. ‘खोके सरकार’ ने लोकशाहीची थट्टा केली, मुंबईकरांना आपले प्रतिनिधी नगरसेवक निवडता आले नाही, यामुळे मुंबईत खड्डे, प्रदूषण आणि भकासपणा आला
3. दिल्ली दरबाराने मराठी अस्मितेला ठेच पोहोचवून राज्यातील नोकऱ्या, गुंतवणूक आणि डायमंड बोर्ससारखे प्रकल्प गुजरातला नेले 
4. भ्रष्ट-युतीने धारावी, आरे जंगल, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कुर्ला डेअरीची जमीन त्यांच्या मित्रांच्या घशात घातली
5. ‘सावकारांचे सरकार’ श्रीमंत मित्रांना खुश करत आहे व एकीकडे लोकल ट्रेनमध्ये हजारो लोकांचा जीव जातो, तर ६० % मुंबईकर आजही झोपडपट्टीत राहतात. 
6. खोके सरकारच्या विफल आरोग्यसेवेमुळे,बीएमसीला 27% कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. अन्न, वैद्यकीय सामग्री व औषधांच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होत आहेत 
7. जेजे, जीटी, सेंट जॉर्ज, कामा अशा काही रुग्णालयांना मोफत आरोग्य सेवा योजनेतून वगळून ‘ सावकारांच्या सरकार’ ने मुंबईकरांना आरोग्यसेवेपासून वंचित ठेवले
8. मुंबईत मुंबईकराला जमीन नाही, दुसऱ्या बाजूला विमानतळ अदानींना तर 5,000 कोटींचे हॉस्पिटल लोढा यांना विकले
9. शिंदेंच्या नेत्याने निष्पाप मुंबईकरांना गाडीखाली चिरडले, हे सावकारांचे सरकार आरोपपत्रही दाखल करू शकले नाही 
10. मुंबईत रोज सरासरी होणाऱ्या 1 बलात्कार आणि 6 विनयभंगाच्या घटनांवरून सिद्ध होते, महिलांचे संरक्षण करण्यात फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत
11. 'गुंड-युती' गुन्ह्यांना प्रोत्साहन देते, नेते पोलिस ठाण्यात गोळीबार करतात, तर हत्या फेसबुक लाईव्हवर होते
12. ‘सावकारांच्या सरकारने’ होर्डिंग खाली पडलेल्या प्रेतांकडे दुर्लक्ष करून रोड शो केला.
13. ‘ खोके सरकार’ तरुणांना बेकारीत ढकलत आहे, NEET पेपर लीक युतीच्या अपयशाचा दाखला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange : लाडकी बहीण योजना आताच आणायची होती का? कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये; मनोज जरांगेंसमोर मराठा विद्यार्थीनीने टाहो फोडला