Uddhav Thackeray, छत्रपती संभाजीनगर : "महाराष्ट्रात सगळीकडे थेर चालू आहेत सरकार आपल्याला. सगळ्या योजनेला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. आपलं सरकार आल्यानंतर आपण जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत", असा शब्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
गद्दाराने आपल्याला पाडावे ही खंत आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, मला रुख रुख आहे की, संभाजीनगरमध्ये लोकसभेला आपला उमेदवार पडला. गद्दाराने आपल्याला पाडावे ही खंत आहे. आज माझा त्यांना आव्हान आहे, येऊ दे विधानसभा तुमच्या ढुंगणाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकी आधी कोर्टाचा निकाल लागेल की नाही माहित नाही. कारण मोदी सरन्यायाधीशाच्या घरी जातात. बरं झालं मोदी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही.
वैजापूरला लागलेला गद्दारीचा कलंक संपवायचा आहे
संजय राऊत म्हणाले, वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक जण आले गेले संपले. वैजापूरला लागलेला गद्दारीचा कलंक संपवायचा आहे. आता आम्ही वाट पाहतोय विधानसभा निवडणूक कधी येते. या 40 गद्दारांना कसे गाडतो याची तयारी होताना दिसत आहे. श्रद्धा आणि सबुरी आता संपली. 1500 रुपयात बहिणीला मतांसाठी विकत घेतले जात आहे. 11 कोटी जनतेचा लाडका मुलगा चेहरा उद्धव ठाकरे आहेत ज्या वेळी हा चेहरा मुख्यमंत्री होईल.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार या राज्याचे सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, पण सरकार बांधावर आलं नाही. मराठवाड्यातला सुपूत्र असलेला कृषिमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरला नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 18 कोटींचा पुतळा 12 लाखात उभा केला आणि वाऱ्याच्या झुलकीन पडला पुतळ्याच्या भ्रष्टाचार करणार सरकार आहे.
5 वेळ निवडून दिले मात्र निष्ठेचे पाणी पिले नाही, गद्दारीची दारू प्यायला गेला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंवर केली. भाजप म्हणते ती इफ्तार पार्टी चूक की बरोबर माहित नाही. मात्र पंतप्रधान सरन्यायाधीशांकडे बाप्पाच्या आरतीला गेले म्हणूज आमहाला तारीख पे तारीख मिळते काय? आमची विनंती आहे तारीख द्या, नाहीतर थेट निवृत्ती नंतरची तरी तारीख द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या