Uddhav Thackeray. ठाणे : "नुसत्या घोषणा नाही, तो त्वेष आहे, उद्वेग आहे, संताप आहे. मिंधे सरकार घोषणांचा पाऊस करतय. अंमलबजावणीचा दुष्का आहे. मिधेंचे कलेक्टर आहेत, चांडाळ चौकडी आहे. त्यांना तुरुंगाचे गज मोजायला सांगूयात. ही गंमत नाहीये, ठाणे उभ राहिलं ते शिवसैनिकांचा प्रेम आहे. शिवसैनिकांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेंची दाढी उगवली नसती. संजयने उत्तम भाषण केलं आहे. आता उत्सुकता नमक हराम 2 ची आहे. समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. नागाची उमपा तुम्ही दिली पण मला नागाचा अपमान करायचा नाही. हे मांडूळ आहे. हे सरपटणारे प्राणी आहे. हे मोदींसमोर वळवळणारे म्हांडूळ आहे. रोज घालीन लोटांगण सुरु आहे", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते ठाण्यातील मेळाव्यात बोलत होते.
कल्याणमध्ये मिधेंचे कार्टे उभे होते, आमच्या शिवसैनिकाचा पराभव करण्यासाठी विश्वगुरुंना बोलवावे लागले
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी ठाणेकरांचे कौतुक करण्यास करण्यास आलो आहे. सर्वकाही पळवलं तरी सव्वापाच लाख पाठीशी उभे राहिले. कल्याणमध्ये मिधेंचे कार्टे उभे होते, आमच्या शिवसैनिकाचा पराभव करण्यासाठी विश्वगुरुंना बोलवावे लागले. मुंबईमध्ये कीर्तिकरांची सीट 48 मतांनी गेली ही चोरलेली सीट आहे. पदवीधरमध्ये शिवसैनिक निवडून दिला. कोकण माझंच आहे. हे सगळे चाळे अब्दालीचे चाळे आहे. मी का अब्दली का बोललो? रागाने नाही बोललो. अहमदशाह अहमदाबाद शाह नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब महाराष्ट्रवार चालून आला. औरंगजेबाच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे. तसे अब्दालीच्या खेचऱ्यांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतोय. तु्म्हाला महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे शिवसेना दाखवून देईल.
उद्धव ठाकरे दिल्लीत होते,अभिमान वाटावा असा दिल्ली दौरा होता
संजय राऊत म्हणाले, मिंधे लबाडी केल्याशिवाय जिंकू शकत नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लबाडी केली. लाडक्या बहिणीची किंमत फक्त दीड हजार केली. लाडक्या आमदारांना 50 कोटी दिले. हा गुजरात पॅटर्न आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत होते,अभिमान वाटावा असा दिल्ली दौरा होता. जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत आले तेव्हा अहमद अब्दाली घाबरून घरी बसला. तुमची कबर खणायला आम्ही दिलीत आलो. तुमच्या पोरा बाळांना दिल्लीत पाठवायचा काम काम उद्धव ठाकरेंनी केले. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे,तोतयांचे यांचे सरकार आहे. शेख हसीना जस पळवून लावलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता पळवून लावेल, असंही संजय राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या