Continues below advertisement

Uddhav Thackeray on Parth Pawar Land Scam : इकडे माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेल्याय त्यासाठी मुख्यमंत्र्याना (Devendra Fadnavis) वेळ नाही. एक तर ते बिहारमध्ये व्यस्त होते, आता ते चोरलेल्या जमिनीवर पांघरून घालण्यासाठी व्यस्त आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी जमीन खाल्ली, त्याच्यावर पांघरून घालायला मुख्यमंत्री तिथे बसले आहेत. तुम्ही माझ्या हाती नांगर, आसूड दिलं ते तुम्हीच हाती धरलं पाहिजे. हे सरकार खंजीर खुपसायला बसलं. त्यावर नांगर फिरवा, आसूड फिरवा, असे आवाहन करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Shaktipeeth Scam: अजित पवारांच्या मुलाचा शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनींमध्ये हात'

Continues below advertisement

शक्तीपीठ महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुलासह सत्ताधाऱ्याचे दलाल खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप द्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे म्हणाले, 'शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती'. हा महामार्ग म्हणजे केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याची आणि कमिशन खाण्याची योजना असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे 86,300 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव देण्यासाठी नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गाच्या वेळी आपण शेतकऱ्यांची बाजू घेऊन मार्ग बदलण्यास आणि योग्य मोबदला मिळवून देण्यास मदत केली होती, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Uddhav Thackeray: '....तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही'

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. हिंगोली (Hingoli) आणि नांदेड (Nanded) येथील परिस्थितीवर बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांवर आणि सरकारच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला. ठाकरे यांनी खासदारांना निर्देश देताना म्हटले, 'जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही'. पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्याने त्यांनी शिवसैनिकांना आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना थेट तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन घेराव घालण्याचे आदेश दिले. सडलेले आणि कुजलेले धान्य देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याच्या त्यांच्या प्रतीकात्मक सूचनेने या प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही, असा आरोप त्यांनी केला.

Uddhav Thackeray : बँकेच्या कर्जापायी जीव दिला, सरकारला जाब कोण विचारणार?

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बँकेच्या कर्जामुळे यशोदा आबाजी राठोड या 68 वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. 'का मुख्यमंत्री का नाही जात यांच्या घरी?' असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. सध्या मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी, राज्यातील शेतकरी सर्वत्र संकटात असल्याचे म्हटले. आपण सत्तेत नसलो तरी आपले कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री असताना कोणताही गाजावाजा न करता कर्जमुक्ती केली होती, याची आठवण करून देत, आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आणखी वाचा