Sushma Andhare on Devendra Fadnavis, Thane : "देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रूसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो. महायुतीत काहीच आलबेल नाही. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाने जाहीर करायला हवी होती, मात्र त्यांच्या पक्षाला तेवढा देखील अधिकार उरलेला नाही", असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय. ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
कळकट मळकट हाताने ते मोदींना कसे बळकट करणार आहेत
सुषमा अंधारे म्हणाल्या, कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात सर्वच आमदारांना माहिती आहे की, या लोकांचे हात भ्रष्टाचाराने किती मळलेले आहेत. अशा कळकट मळकट हाताने ते मोदींना कसे बळकट करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच भान ठेवावं. बालिश विधान त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तर सांगायला दिघे आज हयात नाहीत. त्यामुळे दिघेंच्या नावावर वाटेल ते खपवून आपली पोळी भाजायचा केविलवाणा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. भाजपमध्ये नाराजी आहे. म्हस्केना उमेदवारी देऊन सगळीच मस्करी केली आहे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्हाला काय वाटतं वैशाली दरेकर जिंकून येणार नाहीत. एक कारण सांगा. आत्तापर्यंत शिवसेनेने ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचा कायमच जय झाला आहे. कल्पना नरहिरे हे अत्यंत ग्रामीण भागात काम करणारी बाई मात्र शिवसेनेने ज्यावेळी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळी त्या देखील राज्यमंत्री झाल्या. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली मत ही निव्वळ आणि निव्वळ शिवसेना , मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली होती. तो हात डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं ते आपण बघालच.
कोणाला मस्करी करायची असेल तर 4 जूनपर्यंत वाव आहे
ठाण्यात मी स्वतः फिरले आहे. दहा दिवसात तब्बल 69 सभा कॉर्नर मीटिंग 69 त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत 13 मोठे मिळाले त्यांनी घेतलेले आहेत. नऊ सभा येऊ घातलेल्या आहेत. ती एवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डे चा मतदारांचा जो कनेक्ट आहे, तो सगळा बघता काय कुणाला मस्करी करायची ती करा. 4 जूनपर्यंत यासाठी वाव आहे. एक मध्यमवर्गीय महिला जर ताकदीने लढत असेल तर आपण तिला प्रोत्साहित करायला हवं, असंही अंधारे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Devendra Fadnavis on Shrirang Barne : श्रीरंग बारणेंना कोणत्या तालुक्यातून सर्वांत जास्त लीड मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी