Vaijnath Waghmare: राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे पेटलेला असताना आता दोन गटांमुळे कौटुंबिक संघर्षही पाहायला मिळत आहे. या संघर्षात एका बाजूला गजानन कीर्तिकर आणि विरोधात त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर आहेत. यातच आता ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशानंतर एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले आहेत की, येणाऱ्या काळात सुषमा अंधारे असू दे की कोणी असू देत, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार. तसेच सुषमा हिने राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आमच्यात मतभेद झाले, तेव्हा पासून आमचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले आहेत.
सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले आहेत की, सुषमा अंधारे आणि मी विचारानं वेगवेगळे आहोत. गेली पाच ते सात वर्ष आमचा कसलाही काही संबंध नाही. त्यांची आणि माझी कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय प्रश्नावर चर्चा नाही.
वैजनाथ वाघमारे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, गेली चार-पंच वर्ष मी विभक्त आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांच्या निर्णय स्वातंत्रचा आदर केला पाहिजे. मी त्यांच्या कार्यकीर्दलाही शुभेच्छा देईल. याच्या पलीकडे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे काही नसल्याचं त्या म्हणल्या आहेत.
अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांच्याविषयी माहिती
- अँड. वैजनाथ वाघमारे (आडसकर) B.A.LLB, A bad University.
- महाविद्यालयीन शिक्षण: खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, सामाजिक कार्य / राजकीय कार्य
- कृषि पद्धविका संघर्ष समिती (म.रा.) अध्यन, 8) उस्ताद लहुजी साळवे व वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य समाजापर्यंत पोहवण्याचे काम ते गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत.
- लहुजी साळवे यांचा अलिखित घटनांचा शोध त्यांची तालीम व समाधीस्थळ जिर्णोद्धासाठी मातंग समाज जन जागृती 15 वर्षांपासून करत आहेत.
- 12024-2022 पासून अंबाजोगाई तालुका सरीय सामाजिक सद्भावना प्रमुख संघाचे ओला शाखेचे पद.
इतर महत्वाची बातमी: