Suresh Dhas, Mumbai : " हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते. म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार आहे. तीच गाडी सरेंडर करायला होती. तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती. मला वाटतं पांढऱ्या किंवा काळ्या कलरची गाडी होती", असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


सुरेश धस म्हणाले, बीडच्या लॉकअपमध्ये हे आरोपी ठेऊ नयेत. हे एकतर संभाजीनगरच्या हरसूलला न्यावेत, किंवा नाशिकच्या जेलमध्ये ठेवावेत. कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला लागतील. बिंदू नामावलीमध्ये एसटीच्या जागेवर ठराविक प्रवर्गाचे लोक आले आहेत. एस.सी.च्या जागेवरही ठराविक जागेवरचे लोक आलेत. एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने अधिकारी कर्मचारी बीड जिल्ह्यात कोणत्याही बाबतीत प्रॉबलेम होऊ शकतो. भविष्यात केससुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याची वेळ येईल. बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील. एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर राज्यातील मंत्री ज्यांनी गोपनियतेची शपथ घेतलेली आहे. ते तिथं थांबत असतील तर मंत्री म्हणून घ्यायला देखील ते पात्र नाहीत, असंही सुरेश धस यांनी सांगितलं. 


सुरेश धस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 


उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधून दोन दिवसात त्यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती होईल
एसआयटी पथक जे नेमलयं त्यातील 4 ते 2 जणांबाबत कुटुंबियांचा आक्षेप आहे, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली ती नावे बदलण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
मी मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, त्यामुळे त्याच्या राजीनाम्याचा विषय नाही.
हे आका मोठ्या आकांसोबत सगळीकडे होते, त्यामुळे तिच गाडी सरेंडरसाठी होती तिच गाडी भेटीसाठीही होती
- बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. ते संभाजीनगरमध्ये ठेवावेत
- बिंदू नामवलीत वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकं आलेत
- एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने आल्याने प्रॉब्लेम होऊ शकतो
- मी आता यांना हलवा म्हणतोय भविष्यात ही केसचं दुसरीकडे हलवा म्हणेन.






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Walmik Karad: वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; बजरंग सोनावणेंचा सनसनटी आरोप