Supriya Sule: सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं स्वागत आहे .पण सातवा आरोपी जो खुनी आहे तोच गायब आहे .जगात एवढं तंत्रज्ञान असताना कृष्णा आंधळे नावाचा खुनी फरार आहे .एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही यावर माझा विश्वास नाही . एक निर्णय ओएसडी ना आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय?असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे .छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या बोलत होत्या . (Supriya Sule)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 72 दिवस उलटल्यानंतर या प्रकरणात सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने जेष्ठविधीज्ञ उज्वल निकम (Ujwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली .कृष्णा आंधळेला पकडून अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत .दरम्यान या प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत . (santosh Deshmukh Case)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं मी स्वागत करेल. पण सातवा आरोपी जो खुनी आहे तो गायब आहे. एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही याच्यावर माझा विश्वास नाही .अनेक वेळा मी मुख्यमंत्री एस पी पोलीस यंत्रणेला मी संपर्क केला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची दोनदा भेट घेतली, आम्हालाही सहकार्य करायची पूर्ण तयारी आहे. आम्हाला याच्यात कोणतेही राजकारण आणायचं नाही . बीड मधील दोन कुटुंब आणि परभणीतील एक कुटुंब या तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली .
सातवा माणूस गायब आहे तरी कुठे या जगामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना कृष्णा नावाचा खुनी फरार आहे तो सरकारला सापडत नाही यावर माझा विश्वास बसत नाही. संदीप क्षीरसागर गेली महिनाभर म्हणत आहेत, आरोपी सापडत नाही असं कसं झालं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे.. देशमुख आणि मुंडे कुटुंब या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे . परभणीचे इन्क्वायरी कुठपर्यंत गेली आहे हेही सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे का काम करत नाही.असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारले .
तुमचं सरकार भ्रष्टाचारमुक्त असेल तर सिलेक्टिव्ह वॉशिंग मशीन चालणार नाही :सुप्रिया सुळे
काल मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला ते काय म्हणाले जे ओएसडी किंवा पी एस वर आरोप झाला असेल त्याला आम्ही ठेवणार नाही, त्याचा मी स्वागत करते, मात्र एक निर्णय ओएसडी ना आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय?ओएसडी आणि पीए ठेवताना ज्याच्यावर आरोप झालेल कोणावर केस असेल, त्याला मी मंत्रालयात ठेवणार नाही असं म्हणत आहात, तर मग मंत्र्यांसाठी दुसरा कायदा?असा सवालही सुळे यांनी केला . तुमचं सरकार खरच भ्रष्टाचारमुक्त असेल तर वाशिंग मशीन सिलेक्टिव्ह चालणार नाही .सुरेश धस यांचे स्टेटमेंट मी ऐकलं होतं आता ते मला खरं वाटतंय,मी एकटी आरोप करत नाही सगळे करत आहेत.. महाराष्ट्रमध्ये अनेक मंत्र्यावरती असे आरोप होत आहेत हे दुर्दैव आहे. ज्यांना दोन वर्षे शिक्षा झाली आहे ती कोर्टाने केली आलेली आहे आम्ही नाही केली. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या .
हेही वाचा: