पुणे : पुण्यातील (pune) वैष्णवी हगवणे मृ्त्यूप्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या आरोपींचे लाड पोलिसांकडून पुरवले जात आहेत. आरोपींना तुरुंगात धाब्यावरुन जेवण मिळत असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांना केला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी व्हिडिओ कॉलद्वारे वैष्णवीच्या वडिलांना फोन करुन मी तुमच्या पाठीशी आहे, खंबीरपणे आपण या प्रकरणात लढणार आहोत, असे म्हणत धीर दिला. त्यावेळी, वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ते सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. सासरच्या जाचाला कंटाळूनच आपल्या लेकीनं जीवन संपवल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केल्यानंतर हगवणे कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी यांच्या आई-वडिलांशी फोनद्वारे संवाद साधला आहे. वैष्णवी यांच्या आई वडिलांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच त्या हजर राहू शकल्या नाहीत त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आरोपींना धाब्यावरून जेवण दिले जात असल्याचा आरोप यावेळी वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे. याबाबत देखील आम्ही दखल घेऊ असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ही लढाई आता तुमची एकट्याची नाही, आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत, असे सुप्रिया सुळेंनी म्हणतात वैष्णवीच्या आई-वडिलांनी हात जोडून सुप्रिया सुळेंपुढे आपली कैफियत मांडली. ताई, आता आमच्या मुलीला न्याय द्या, एवढीच मागणी आहे. तर, अटकेत असलेल्या तीन आरोपींना हॉटेलचं जेवण दिलं जात आहे, रंगीला पंजाब हॉटेलमधून ह्या आरोपींना जेवण दिलं जातंय, असे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले. त्यावर, प्रशांत जगताप यांना सुप्रिया सुळेंनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच, मी लवकरच भेटायला येईल, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
लग्नात 51 तोळे सोनं अन् फॉर्च्युनर दिली
राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
हेही वाचा
माहेरी आलेल्या लेकीवर काळाचा घाला, स्लॅब कोसळून दोन वर्षांची चिमुकली ठार; आईने फोडला हंबरडा