Sunil Tatkare on Bharat Gogawale: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना खोचक टोला लागवालय. “हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोलणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लावून पाहिली, दुर्बीण लावूनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय. 

Continues below advertisement


महाडमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला. सुनील तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत आमच्यासमोर खूप अजेंडे आहेत. गेली चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाही. 


Sunil Tatkare on Bharat Gogawale: सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना खोचक टोला


मी अनेकांचे वक्तव्य ऐकतो की, महाड शहरात काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला. शहरामध्ये मी फिरलो. दुर्बिण लावून बघितले. जाड भिंगाचा चष्मा लावला. पण मला तसं काही कुठे दिसले नाही. प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था पाहिली. ते पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड? अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळत आहे. महाड शहरात अनेक विकास कामे रखडली असून यावर बोलायला खूप वेळ आहे, असे म्हणत तटकरेंनी मंत्री भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेतला. आता सुनील तटकरे यांच्या टीकेवर भरत गोगावले नेमका काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


Sunil Tatkare on Mahendra Dalvi: सुनील तटकरेंचे महेंद्र दळवींना प्रत्युत्तर 


रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद अजूनही थांबत नाहीये. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा सुनील तटकरे यांनी महाड येथे चांगलाच समाचार घेतला. दळवींनी केलेली वक्तव्ये ही निंदनीय आहेत. माझावर टीका करणारी माणसे ही न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेली असून आम्ही भाजप आणि राष्ट्रवादी नेटाने काम करू, असा इशारा त्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना दिलाय.


Mahad Election 2025:  महाडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे शक्तिप्रदर्शन 


दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असलेल्या महाडमध्ये आज भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. महाड नगरपालिका यंदा राष्ट्रवादी आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपला सोबत घेऊन शिंदेच्या सेनेला शहा देण्यासाठी जोरदार तयारीनिशी रणांगणात उतरली आहे. महाड नगर पालिकेवर राष्ट्रवादी 15 तर भाजप 5 जागांवर ही निवडणूक लढणार असून नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे महाड नगरपालिका यंदा चुरशीची रंगण्याची शक्यता आहे. भाजपने राष्ट्रवादीसाठी हातमिळवणी केल्याने शिंदे सेनेला कोंडीत पकडण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांचा डाव यंदा यशस्वी ठरेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ



आणखी वाचा 


Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 जणांची तोफ धडाडणार; नगरपालिका अन् नगरपंचायतीसाठी स्टार प्रचारकांची घोषणा