Solapur BJP News : सोलापुरतील भाजप कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनावरून आता भाजपमधेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे समोर आलं आहे. अशातच आता भाजपच्या माजी उपमहापौरांनी गंभीर आरोप करत आजचे आंदोलन हे स्पॉन्सर असल्याचा दावा केला आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी आजच्या आंदोलनावर हे आरोप केले आहे. आजचे आंदोलन हे स्पॉन्सर होते, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आज जी भाषणे झाली, त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही राजेश काळे यांनी केलीय.

Continues below advertisement

Rajesh Kale on Congress Mukt Bharat : काँग्रेस मुक्त भारत ही भाजप पक्षाची भूमिका

दरम्यान, काल (20 ऑक्टोबर) काही महिला पदाधिकाऱ्यांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्याचे सांगितले. दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे. काँग्रेस मुक्त भारत ही भाजप पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते आहेत. यांना विरोध करायचा होता तर त्यांनी प्रदेश कार्यालयात जायचे होते. काल काही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते. त्यांनी मला स्पीकर फोनवर ऐकवले की आजचे आंदोलन कसे स्पॉन्सर होते ते. दिलीप माने यांची स्वतःची एक ताकत आहे. ते स्वतः एक ब्रँड आहे. आज जी भाषणे झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही राजेश काळे या वेळी म्हणाले.

Rajesh Kale : घराणेशाही टिकवण्यासाठी हा सगळा स्टंट

लोकसभेला 10 हजार लीड होता, मग चार महिन्यात विधनासभेला 77 हजार लीड कसा झाला? ज्यांनी आज आरोप केले त्यांचा इतिहास काय आहे? दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश व्हावा आम्हाला वाटलं होतं. आज आलेल्या महिला कार्यकर्त्यांना काळे कपडे घालून येण्यासाठी फोनवरून दम देऊन सांगितले. आजचा स्टंट हा ठरवून केलेला आहे, त्यामुळे याबाबत प्रदेश कार्यालयाकडे तक्रार करणार आहे. घराणेशाही टिकवण्यासाठी हा सगळा स्टंट आहे. आगामी काळात उमेदवार जाहीर झाल्यावर स्पष्ट होईल. त्यामुळे माझी पक्षाकडे विनंती आहे की दिलीप माने यांचा आणि त्यांच्यासोबत येणाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला पाहिजे. असेही माजी उपमहापौर राजेश काळे म्हणाले.

Continues below advertisement

आणखी वाचा