Maharashtra Politics चंद्रपूर : भाजपच्या जेष्ठ नेत्या, माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काकू शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचं नाव न घेता भर कार्यक्रमात कानपिचक्या दिल्याचे समोर आले आहे. "जोरगेवार चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं, छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका" अशा शब्दात शोभाताई फडणवीस यांनी खडे बोल सुनावले आहे. मात्र हे बोलत असताना त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता हे जारी त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी हा टोला भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी, शोभाताई फडणवीसांचे खडे बोल
दरम्यान, भाजपच्या स्थापना दिनानिमित्त काल (7 एप्रिल) चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होतं. यात मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. एकाच शहरात भाजपचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आणि एकमेकांच्या कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ लक्षात घेता चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. अशातच पक्षातील या गटबाजीवर शोभाताई फडणवीस यांनी बोट ठेवत जाहीरपणे आपली तीव्र नाराजी बोलून दाखवली आहे.
जोरगेवारांकडून भाजप कार्यालयासाठी स्वतःची एक एकर जागा दान
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भाजप कार्यालयासाठी स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान करण्यात आली आहे. किशोर जोरगेवार यांचा नवीन चंद्रपूर भागातील या जागेवर चंद्रपूर महानगर भाजपासाठी सुसज्ज असं कार्यालय तयार करण्याचा मानस आहे. चंद्रपूर शहरात भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यामुळे मोठे कार्यक्रम घेता येत नसल्याची खंत किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे. ही खंत व्यक्त करतानाच त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा भाजप कार्यालयासाठी दान करणार असल्याची घोषणा केलीय. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त काल (6 एप्रिल) चंद्रपूर शहरातील कन्यका मंदिर सभागृहात भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बोलताना जोरगेवार यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या