Thackeray Group Shiv Garjana Abhiyan: ठाकरे गटाकडून ''शिवसेना' (Shiv Sena) नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयाने गेल्यानंतर ठाकरे गटाने तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी, युवा नेते, महिला आघाडीया शिवगर्जना अभियानामध्ये ठाकरे गटाची पुढील दिशा पोहोचवणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणि राजकीय घडामोडी घडत असताना शिवगर्जना अभियानांतर्गत ठाकरे गट तेवढ्याच आक्रमकतेने आपली पुढची रणनीती या अभियानातून ठरवणार आहे. यातच कसं असणार हे शिवगर्जना अभियान? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय जाहीर केला. ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव गेलं आहे धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा गेलं. आता नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान सुरू करण्या आले आहे. सध्या ठाकरे गटावर ओढवलेली संकटाची स्थिती पाहता आपल्या उरलेल्या पक्षाला गटाला नवसंजीवनी देण्याचा नवी चेतना जागृत करण्याचा या शिवगर्जना अभियानातून प्रयत्न केला जाणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र कोकण, विदर्भ ,मुंबई (Mumbai) या विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते, उपनेते, युवा नेते, महिला आघाडी, प्रवक्ते उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची भूमिका पक्षांची पुढची रणनीती तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहे. संजय राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, अनिल देसाई, वरूण सरदेसाई, किशोरी पेडणेकर हे सर्व नेते ग्राउंडवर जाऊन या शिवगर्जना यात्रेतून ठाकरे गटाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांची प्रश्न त्यांची समस्या सोडवणार आहेत. शाखांचे प्रश्न, रिक्त पदांच्या नियुक्ती, स्थानिक प्रश्न हे सगळे या शिवगर्जना अभियानात मांडले जातील आणि सभांमध्ये शिंदे फडणवीस सरकार आणि खास करून शिवसेना शिंदे गटावर टीकेचे बाण सोडण्यात येणार आहे.
एकीकडे अधिवेशन सुरू होत असताना ठाकरे गटाचे आमदार जरी या शिवगर्जना यात्रेत अधिवेशनामुळे सहभागी होऊ शकत नसले तरी बाकी सर्व नेते या अभियानात सहभागी होतील. त्यामुळे एकीकडे अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना सभागृहात घेरण्याचा आणि दुसरीकडे तळागाळात पोहोचून आपला आवाज कार्यकर्त्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आता ठाकरे गटाचा असणार आहे. दरम्यान, शिव संवादानंतर होणारी ही शिवगर्जना ठाकरे गटाला या अडचणीच्या काळात कितपत नवसंजीवनी नवं चेतना नवी उभारी देते? तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती यशस्वी ठरते का? सुसंवाद प्रमाणे शिवगर्जनेला तळागाळातील कार्यकर्त्यांची साथ मिळणार का? हे या शिवगर्जने अभियान अंतर्गत पाहायला मिळेल.