Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026 मुंबई: राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. आता सर्वच राजकीय पक्षाकडून प्रचाराला सुरुवात होईल. राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, संयुक्त सभा आणि मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय. यासाठी काही पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या याद्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत तर काहींनी यादी जाहीर न करता सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचं नियोजन करायला सुरुवात केली आहे. जिथे जिथे ज्या ज्या पक्षाची ताकद आहे. तिथे त्या पक्षाचे महत्त्वाचे नेते सभा घेतील अशा प्रकारे नियोजन केलं जातंय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार आहे. वरळी डोम इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त मेळावा होणार आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधंकडूनही (Raj Thackeray-Uddhav Thackeray) संयुक्त सभांचं आयोजन करण्यात आलंय. 5 जानेवारीला पहिली सभा घेतली जाणार आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबतच काँग्रेस पक्षसुद्धा आपल्या स्टार प्रचारकांच्या विविध सभांसाठी मैदानात उतरणार आहेत. (BMC Election 2026)
आदित्यसह अमित ठाकरे आज शिवसेना भवनात पोहोचणार- (Amit Thackeray-Aditya Thackeray)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते अमित ठाकरे दादरमधील शिवसेना भवनात जाणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबईतील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या 227 उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार युतीच्या मुंबई महानगरपालिकेतील 227 उमेदवारांशी शिवसेनाभवन दादर येथे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. तर 4 जानेवारीला राज ठाकरे स्वतः शिवसेना भवनात येणार आहेत. वचननामा जाहीर करण्याचा कार्यक्रम सेना भवन येथे होणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. (Amit Thackeray-Aditya Thackeray)
काल उद्धव ठाकरे आदित्यसह पोहोचले शिवतीर्थावर- (Shivsena UBT-MNS Alliance)
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काल (1 जानेवारी) राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रचार रणनीतीवर चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे उमेदवारांच्या निश्चितीसाठी मातोश्रीवर गेले होते. युती घोषित झाल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये वारंवार बैठका होत आहेत.
मुंबईत 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार? (BMC Election 2026)
राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता 'ठाकरे बंधू विरुद्ध महायुती' असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. (BMC Election 2026)