Chandrapur Mahanagarpalika Election 2026: आगामी महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असल्याचेचित्रआहे. अशातचआताकाँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) युतीची घोषणा केलीआहे. यातमुंबईत वंचितला 62 जागा मिळणार आल्याची माहिती आहे. भाजपला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, ही नवी सुरुवात असल्याचीप्रतिक्रियाकाँग्रेसचेनेतेआणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तरदुसरीकडे मुंबईत वंचितसोबत आघाडी होत असतानातिकडे चंद्रपूर महानगरपालिकेसाठीही शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाल्याची घोषणा करण्यातआलीआहे.

Vanchit Bahujan Aghadi on Congress : काँग्रेसवर सडकून टीक, ठाकरेंच्याशिवसेनेसोबत वंचितचीयुती

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी उद्धवठाकरेंच्याशिवसेनेनंप्रकाशआंबेडकरांच्यावंचितसोबतयुतीकरूननिवडणूकएकत्रलढण्याचानिर्णयघेतलाय. यावेळीदोन्हीपक्षाच्याकार्यकर्त्यांनीआणिनेत्यांनी एकमेकांना स्वतःच्या पक्षाचे दुपट्टे घालून युतीची घोषणा केलीय. यावेळी दोन्ही पक्ष आगामी महानगरपालिकेत समसमान म्हणजे 33-33 उमेदवार उभे करणार आहेत. ज्यामध्ये काँग्रेसकडून सन्मानजनक वाटा न दिल्याने आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर सडकून टीकाहीकेलीय.

Vanchit Bahujan Aghadi  : युतीचे गणित सोडविण्यात हर्षवर्धन सपकाळ यांना यश, मुंबईत वंचित 62 जागांवर मैदानात उतरणार

दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची घोषणा केलीआहे. दरम्यान मुंबईत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर मैदानात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आज वंचित आणि काँग्रेसने एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली आहे. मागील दोन दशकांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत युती करण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केलेलं आहेत. माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तर नाना पटोले यांच्याकडून ही प्रयत्न केले गेले. पण युतीच गणित काही सुटले नाही. मात्र युतीचे गणित सोडविण्यात हर्षवर्धन सपकाळ यांना यश आलेले आहे.

काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, असे म्हणत त्यांनी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ आणि तर हा विचारांचा मेळ आहे. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या