संभाजीनगर : मनसेचे (MNS) प्रवक्ते राहिलेल्या प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. मात्र, कुठल्याही राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला नव्हता. अखेर, तीन वाट पाहिल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली. शिवसेनेचे प्रवक्ते बनताच प्रकाश महाजन यांनी अपेक्षेप्रमाणे ठाकरे बंधू आणि भाजपवर हल्लाबोल केला. आपली पहिली तोफ ठाकरेंवर डागताना महाजन यांनी भाजपलाही सोडलं नाही. भाजपला (BJP) आता मुंडे-महाजनांची गरज राहिली नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावलं. तर, ठाकरे बंधूंनी हिंदुत्त्व सोडल्याचं सांगत विठ्ठल
तुम्ही हिंदू म्हणून कुठे आहेत, आता त्यांना मुंबईत अस्तित्व टिकवायचे आहे, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीवरुन ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपवरही निशाणा साधत आपण भाजपात का गेलो नाही, भाजपने मला तीन महिने ताटकाळत ठेवलं. आता, भाजपला मुंढे-महाजनांची गरज नाही, जे आहेत त्यांना संभाळा अशा शब्दात प्रकाश महाजनांनी शिवसेनेतील प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार टीका केलीय.
मी भाजपमध्ये गेलो नाही, कारण त्यांनी मला तीन महिने ताटकळत ठेवलं. मी त्यांची एंट्रन्स परीक्षा पास झालो नाही, पण ज्यांनी भाजपवर टीका केली ते सगळे आज भाजपात आहेत. दिनकर पाटील भाजपावर बोलले तो भाजपात आहे. भाजपच्या घराला दार नाही पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी मुनगंटीवार यांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही, असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले.
आम्ही विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे का?
मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार, देशहित असे बोलले जाते, गरिबांनी केले की शेण खाल्ले म्हणतात. विठ्ठल बदलणार नाही म्हणाला होतात, मी कधीही विठ्ठल बदलला असता तर मला हाच प्रश्न केला असता. मी तीन महिने वाट पाहिली, मलाही हिंदुत्वावर काम करायचे होते. पाच वर्ष मनसेत होतो, तपश्चर्या केली. राजीनामा दिल्यावर तीन महिने वाट पाहिली, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी आपल्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. तसेच, पैशामुळे महाजनांनी पक्ष सोडला म्हणतात, जे लोक असे प्रश्न विचारतात ते जनावरांच्या बाजारात दलाली करतात, असे महाजन यांनी म्हटले. आमच्यावर विठ्ठलाचे प्रेम नव्हते, विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे. मी म्हणलो होतो विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलाने लक्ष दिले पाहिजे नाही का? असे म्हणत प्रकाश महाजन यांनी थेट नाव न घेता राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.
त्या दिवशी बाळा नांदगावकर कुठे गेले?
लहान्या कार्यकर्त्याने निष्ठा सोडली की गद्दार म्हणतात, जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत आता राहणार. मी म्हणलो भाऊ भाऊ एकत्र या. पण, ते मराठी माणसापासून दूर जाताना दिसले ते मला खटकले. चंदुमामा सोडा, रशीद मामू आला, हे राज ठाकरे यांना खटकले नाही. मी कुठे स्वार्थासाठी हे म्हणलो होतो? असा सवालही प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंना विचारला. एकत्र आल्यानंतर अनेक जण आठवत आहेत. शिवसेना-मनसे युतीत ज्या जागा पाहिजे होत्या, त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे, अनेकजण नाराज आहेत, त्या दिवशी बाळा नांदगावकर कुठे गेले होते? असा थेट सवाल महाजन यांनी विचारला.