मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून देशभरात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. एसआयआरमधून काही नावं मतदार यादीतून वगळली जात आहेत. देशात तब्बल 10 कोटी तर महाराष्ट्रात तब्बल एक कोटी मतदार वगळले जाऊ शकतात अशी चर्चा निवडणूक आयोगात असल्यानं एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पार्श्वभूमीवर सतर्क झाली आहे. शिवसेनेने एसआयआर संदर्भात लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक लावली आहे. या बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण हा प्रमुख अजेंडा आहे. शिवसेनेच्या एकाही मतदाराचं नाव डिलीट होता कामा नये त्यासाठी तुम्ही काळजी घ्या, असेल. शिवसैनिकांना हातामधली काम बाजूला ठेवून 15 मे पर्यंत जी मोहीम राबवली जातेय त्यावर लक्ष द्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
एसआयआरच्या मोहिमेत BLO घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. प्रत्येक मतदाराची खोलवर पडताळणी या बीएलओच्या माध्यमातून होणार आहे. विधानसभा मतदार संघातील यादी भागासाठी पक्षाकडून BLA निवडले जाणार व त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे. बीएलए निवडीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर आपण गाफिल राहिलो तर आपला दुसरा नंबर जाऊ शकतो. BLO जर चुकीचं वागला तर तकार करावी, असं देखील सांगण्यात आलं आहे.
आपले मतदारच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेत तेच वगळले गेले तर काय होणार? त्यामुळे आपले मतदार वगळणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या, असं सांगण्यात आलं आहे. शिवसेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
इतर राज्यात SIR मोहिमेच्या अंतर्गत वगळण्यात आलेली संख्या खालील प्रमाणे:
पहिला टप्पा बिहार -65 लाख उत्तर प्रदेश - 2.89 कोटी तामिळनाडू -97 लाख गुजरात -73 लाख पश्चिम बंगाल -63 लाख राजस्थान- 44 लाख केरळ -24 लाख छत्तीसगड - 27 लाखगोवा - सुमारे 10 लाख
