Continues below advertisement


मुंबई : शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोनवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन रुन संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केल्याची माहिती आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात (Mumbai) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर, सोमवारी संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी फोन करुन लवकर बरे व्हा.. असा आपुलकीचा संवाद साधला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जाहीर सभेतून संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली होती.


संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पुढील दोन महिने सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मिडीया 'एक्स' (X) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळासह त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले, अनेकांनी “काळजी घ्या”, “Get well soon” अशा शुभेच्छाही त्यांना दिल्या. आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. त्यावर, राऊतांनी (Raut) उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे,” असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'धन्यवाद my dear Aaditya' अशी पोस्ट लिहली.


एकनाथ शिंदेंचा फोन, काळजीवाहू विचारपूस (Eknath Shinde Call to Sanjay Raut)


दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “आपली लेखनी चालली पाहिजे” असे म्हणत हाती पेन घेतल्याचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे, अनेकांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या धारधार शब्दांची आठवण झाली होती. तर, आता उपमुख्यमंत्री आणि सध्याच्या राजकारणात संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ही त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच “लवकर बरे व्हा” असा काळजीवाहू संदेशही दिला. या फोन कॉलचा व्हिडिओ एबीपी माझा च्या हाती आला आहे.



गुलाबराव पाटलांना जाहीर सभेतून आठवण (Gulabrao Patil Remembers Sanjay Raut During Public Meeting)


बघा ना माझा संजय राऊत (Sanjay Raut) कसा ऍडमिट आहे. काय सांगावं तुम्हाला, वो मेरा माल है भाई, माल है. ते वाचलं पाहिजे. मी देवाला प्रार्थना केली की त्याला सद्बुद्धी दे. सत्यानाश करणाऱ्या लोकांना देवाने चांगली बुद्धी दिली तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोबत जे 20 लोकं आहेत ते टिकून राहतील, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं होतं.


हेही वाचा


सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया गौप्यस्फोट करणार