Hemant Patil on Ashok Chavan : अशोकाचे झाड हे दिसायला उंच आणि हिरवेगार असते. पण 12 वाजता त्यांची सावली केवळ स्वतःलाच मिळते, इतरांना मात्र ना सावली ना फळ असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी नाव न घेता भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली. 

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यात महायुतीला 9 जागा मिळून सुद्धा मंत्रीपद मिळालं नाही

पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हेमंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यात महायुतीला 9 जागा मिळून सुद्धा मंत्रीपद मिळालं नाही. अशोक चव्हाण यांच्यामुळेच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यामुळं हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली की काय? अशी चर्चा पाटील यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात सुरु आहे.

समोरचे अशोकाचे झाड पाहून हेमंत पाटलांची टीका

खासगी कार्यक्रमात हेमंत पाटील यांच्यासमोर अशोकाचे झाड दिसले. त्या झाडाला पाहूनच हे अशोकाचे झाड म्हणजे दिसायला उंच आणि हिरवगार असते. पण त्याची 12 वाजता सावली केवळ स्वतःलाच मिळते इतरांना ना सावली ना फळ असे हे झाड असल्याची बोचरी टीका हेमंत पाटील यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर केली होती. 

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ 

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. या जिल्ह्यात बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला होता. या जिल्ह्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, सर्वच जागांवर माहयुतीनं वर्चस्व मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला नांदेड जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. विधानसभेच्या 9 जागांपैकी एकही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला नाही, सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी?

भोकर - श्रीजया चव्हाण विजयी (भाजप)नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट)नांदेड दक्षिण - आनंद बोंढारकर (शिवसेना शिंदे गट)नायगाव - राजेश पवार (भाजप)देगलूर -  जितेश अंतापूरकर (भाजप)मुखेड -  तुषार राठोड (भाजप)लोहा -  प्रताप पाटील चिखलीकर (अजित पवार गट)हातगाव - बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)किनवट - भीमराव केराम (भाजप)