Shiv Sena on Ravindra Chavan: काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर थेट आरोपांचा भडिमार केला. उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेतून चव्हाण यांच्यावर “प्रलोभन देऊन पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करतात” असा गंभीर आरोप केला.

Continues below advertisement

पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणाले की,  रविंद्र चव्हाण कल्याण-डोंबिवलीतील इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जातात. महामंडळ देऊ, निवडणुकीचा खर्च देऊ, विशेष पॅकेज देऊ, असे प्रलोभने दाखवतात. हे आरोप फक्त डोंबिवलीत आम्ही करीत नाही तर मालवणमध्येही झाले आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.

Shiv Sena on Ravindra Chavan: रवींद्र चव्हाणांना कोणत्या बेसवर प्रदेशाध्यक्ष केले?

या सांस्कृतिक नगरीत रविंद्र चव्हाण कुठल्या दिशेला चाललेले आहेत? त्यांची भूमिका योग्य नाही, इतक्या मोठ्या पदावर असून चार वेळा आमदार, एक वेळा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झालेत. तरी त्यांना स्वत:चे गड, शहर आणि मतदार संघ बांधता आले नाही. त्यांनी कोणत्या बेसवर पक्षाने प्रदेशाध्यक्ष केले आहे? असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. तर शिवसेनेचे शंभर कार्यकर्ते फोडले त्यातून हजार कार्यकर्ते करण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसेना-भाजपची युती अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. हे रविंद्र चव्हाण यांनी लक्षात ठेवावे, असा टीका शिंदे गटाने रवींद्र चव्हाण यांच्यावर केलीय. 

Continues below advertisement

Vikas Desle : शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख भाजपमध्ये दाखल

दरम्यान, कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. केडीएमसी भाजपा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेश सोहळ्यानंतर शिवसेना शिंदे गटाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय.

आणखी वाचा 

Malvan Nagarparishad Election: मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड सापडली, निलेश राणेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या