Sharad Pawar and Manoj Jarange Patil: गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे शनिवारी आझाद मैदानात येऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. काल रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) हे आज मनोज जरांगेंच्या भेटीला येऊ शकतात, अशी माहिती आहे. शरद पवार हे सध्या पुण्यातील उरळी कांचन येथे आहेत. ते संध्याकाळच्या सुमारास मुंबईत येतील तेव्हा आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांना भेटतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे हे शनिवारी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. काल रात्री राजेश टोपे आझाद मैदानात आले होते. मात्र, मनोज जरांगे झोपल्याने त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही. त्यामुळे आज टोपे पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला येणार आहेत.
Sharad Pawar on Maratha Reservation: शरद पवार मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले?
शरद पवार यांनी शनिवारी अहिल्यानगर येथील कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, 2 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Reservation) होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो.
सध्या राज्यातील सामाजिक ऐक्य अडचणीत येते की, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासाठी आरक्षण हे काय नवीन नाही राजर्षी शाहू महाराज यांनी मागास समाजासाठी आरक्षणाची गरज लक्षात घेऊन 50 टक्के आरक्षण दिले. सध्या आरक्षणावरून वादावादी सुरू झालेली पाहायला मिळते हा वाद समाजामध्ये कटूता निर्माण करते की काय अशी चिंता आहे. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी अशी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही समाजामध्ये खूप अडचणी आणि मागासलेपण आहे. हाल सहन करणारा खूप मोठा वर्ग आहे आणि प्रगतीत वाढ हवी असेल तर त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. मराठा समाजातील मोठा वर्ग शेती करणारा आहे मात्र शेतीतूनही प्रगती होत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हा पर्याय असल्याचे मत शरद पवारांनी मांडले.
प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याचा वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. मराठा आरक्षण देताना दोन समाजामध्ये कटुता वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी काही धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्याचे गरज आहे. आरक्षण देण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाचे काही निकष आहेत त्यानुसार 50%,52% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. मात्र तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आहे आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टात देखील टिकले. केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागतो. वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
आणखी वाचा