Sharad Pawar on Alliance With BJP : मुंबई : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवारांनीच भाजपसोबत (BJP) जाण्याचं ठरवलं होतं. पण ऐनवेळी माघार घेतली, असा दावा केला आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट भाष्य केलं आहे. आमच्या सर्वांचं गेली अनेक वर्ष भाजपसोबत जाण्याचं मत होतं, पण या मतातही दोन वेगवेगळी मतं होती, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना शरद पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीवेळी नेमंकी काय झालं होतं, यावरही भाष्य केलं आहे. 


राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न यापूर्वी किती वेळा केलाय? अनेकदा चर्चा होऊनदेखील भाजपसोबत थेट जाण्याचा मार्ग का नाही निवडला? यावर बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, "आमच्या सर्वांचं गेली अनेक वर्ष असं मत होतं की, आपण सर्वांनी भाजपसोबत जावं. यात दोन पद्धती होत्या, एक त्यांच्यासोबत आणि एक पार्टनर म्हणून. त्यासोबत काही लोकांचं म्हणणं होतं की, त्या पक्षातच जावं... आता यातच प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा आलाय. 2004 मध्ये त्यांचा आग्रह होता, त्यांचं प्रामाणिक मत होतं, वाजपेयी सरकारसोबत आपण जावं. पण मी ते मान्य नाही केलं. माझ्या मताप्रमाणेच त्यांचंही मत होतं, पण शेवटी त्यांनी माझ्या मताचा सन्मान ठेवला."


राष्ट्रवादीतील फुटीवेळी नेमकं काय घडलं? 


"सुदैवानं सरकार आमचं सरकार आलं, प्रफुल्ल पटेल यांनी 10 वर्ष मंत्रीपद भूषवलं. पण अलिकडच्या काळात जे काही आमचे लोक निवडून आले. त्यातील मोठा वर्ग असं म्हणत होता की, आपण भाजपसोबत जावं. शेवटी मी एकदा त्यांना म्हटलं की, तुम्हाला चर्चा करायची असेल तर करा, काय म्हणतात, काय प्रस्ताव आहे ते तर कळु द्यात. त्यानंतर त्यांची चर्चा झाली, पण त्यावेळी मी सांगितलं की, हा प्रस्ताव मला योग्य वाटत नाही. ज्यांना निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे, मी येणार नाही. एक काळ असा आला की, त्यांनी निर्णय घेतला, माझी काही तक्रार नाही, त्यांनी मला फसवून निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा माझ्याशी चर्चा केलेली. त्यानंतर माझी भूमिका मी मांडल्यावर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे झाले.", असं शरद पवार म्हणाले आहेत. 


दरम्यान,  महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 


विधानसभेतही महाविकास आघाडीसोबतच...? 


लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे... असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात. आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही. जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती, पण आपण तिघंजण एकत्र यायचं, त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे. हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sharad Pawar On Party Symbol : लोकसभेला तुतारी फुंकली, विधानसभेला पुन्हा घड्याळ येणार? शरद पवारांनी थेट सांगितलं...