Sharad Pawar on Anil Deshmukh Car Attack : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आलीये. या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. देशमुख काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने हा केला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय. यानंतर अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरसाठी रेफर करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना घेऊन त्यांचे सहकारी काटोल वरून नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर दगडफेक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


एबीपी माझावर शरद पवारांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया 


अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथं ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो. 




सुप्रिया सुळे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.


भाजप नेते अविनाश ठाकरे यांच्याकडून स्टंटबाजीचा आरोप 


अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला जात असला आणि तो हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे असं सांगितलं जात असलं तरी ही स्टंटबाजी असल्यासचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.


माजी खासदार हरीभाऊ राठोड काय म्हणाले ?


राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे. विदर्भात तर मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण झाला आहे. त्यामुळे माझी मागणी आहे अनिल देशमुखांच्या हल्लेखोराना तत्काळ अटक करा, अशी मागणी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर