Sharad Pawar & Ajit Pawar: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्याला अजित पवार किंवा (Ajit Pawar) भाजप यांच्यासोबत जायचे नसल्याचा स्पष्ट संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला. या सगळ्यामागे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं, असे शरद पवार यांनी म्हटले.

Continues below advertisement

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा स्थानिक प्रश्न आहे. आजुबाजूला जे तालुके आहेत, त्यांचे लक्ष इथे नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, आजही नाही. एक विशिष्ट स्थिती झाली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं ते झालं. पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही. हा या कारखान्याचा तात्पुरता 19 हजार सभासदांपुढील प्रश्न आहे. बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही. चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचे बोलणं झालं होते. त्यांना अडचण होती, त्यामुळे आम्ही ताणले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar: शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं कौतुक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमतेच्या (AI) वापराबाबत निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असा आशावाद शरद पवारांनी व्यक्त केला. Al बाबत वर्कशॉप आहेत. माझं तिकडे लक्ष  आहे. महाराष्ट्र सरकारने काल 500 कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केलं. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंद करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

Continues below advertisement

आणखी वाचा

अजित पवारांच्या 'त्या' कृतीने राष्ट्रवादी एकत्र येण्याचा डाव फिस्कटला, शरद पवारांनी सगळेच दोर कापून टाकले