Sharad Pawar and Sanjay Raut, दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देत सत्कार केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. यामध्ये ठाकरेंचे खासदार संजय राऊत हे देखील मागे नव्हते. त्यांनी देखील पवारांवर तोंड सुख घ्यायला मागे-पुढे पाहिलं नाही. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षात झालेल्या वादानंतर आज (दि.20) संजय राऊत आणि शरद पवार दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एकत्र आलेले पाहायला मिळाले. 

शरद पवार काय काय म्हणाले?

शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले, दिल्लीच्या संसदेत स्वतःचे स्थान निर्माण करणे यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. देशाच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात जर स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल सुसंवादाचे केंद्र दिल्ली आहे.  मी 1962-63 ला दिल्लीत आलो.  राष्ट्रीय कमिटीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या. तीन मूर्ती इथे बैठक होती. जवाहरलाल नेहरू यांचे ते निवासस्थान नेहरू तिथे येणार होते. आम्ही औत्युक्याने तिथे उपस्थित होतो. काय बोलायचं कोणत्या गोष्टीचा आग्रह करायचा याचा आम्ही आमच्या आमच्यात सुसंवाद करत होतो … अर्जुन सिंग होते .. अन्य नेते होते .. मुद्दे वाटून आम्ही बैठकीला गेलो … आयुष्यात पहिल्यांदा आम्ही नेहरूंना बघितलं ..इंदिरा गांधी नेहरू दोन्ही नेते आले आम्ही त्यांच्याकडे बघत बसलो पण प्रश्न विचारायचे धाडस आम्हाला झालं नाही.  माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली राष्ट्रीय बैठक पण मला प्रश्न विचारायची हिम्मत झाली नाही.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राऊतांनी सांगितलं दिल्लीचे महत्व अनेकांनी आपलं कर्तुत्व नेर्तुत्व घडवलं हा इतिहास त्यांनी पुस्तकात मांडले आहे.  संसदेची जुनी इमारत इतिहासाची हिस्सेदार आहे.. ही संसदेची इमारत त्याचे नियोजन ब्रिटिशांनी केले. 21- 22 साली ही वास्तू बनवली .. आजपर्यंत लोकांच्या अंतःकरणात स्थान निर्माण केलेलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vicky Kaushal : प्रत्येक सीनसाठी विकी कौशलची जीवतोड मेहनत, एकदा हातही फ्रॅक्चर झाला, अंगावर काटा आणणाऱ्या छावा सिनेमाचं शूटींग कुठं झालंय?