Shambhuraj Desai सातारा: ठाणे, मुंबई या ठिकाणी गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार या संजय राऊतांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई  ( Shambhuraj Desai) यांनी आपली प्रतिक्रिया देत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) डिवचलं आहे. संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या वॉर्डातून पालिका निवडणूकमध्ये निवडून येऊन दाखवावं, असे आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केलंय. आम्ही लोकांच्यातून निवडून आलो आहोत. संजय राऊत यांच्यासारखी राज्यसभेवर बॅकडोर एन्ट्री केलेली नाही. संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या महानगरपालिकेच्या वार्डातून निवडून (Municipal Corporation Election 2026)  येऊन दाखवा, मग आमच्या ठिकऱ्या होणार का याचा विचार करा, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ठिकऱ्या कोणाच्या होणार याबाबत ठाणेकर जनता दाखवून देईल.

Continues below advertisement


Shambhuraj Desai on Sanjay Raut : अर्ध वाक्य जरी खरं ठरलं तरी आम्ही म्हणाल ते ऐकू


ठाण्यात जो मागे मोर्चा काढला त्याला 400 लोकांच्यावर लोक नव्हते. सर्व लोक आणले ते बाहेरून आणले होते. संजय राऊत काय आहेत, हे ठाणेकरांना चांगलेच माहित आहे. आता जे बहुमत आहे त्यापेक्षा जादा बहुमत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळेल. अशी सडेतोड प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये आम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली होती. त्यावेळेस देखील संजय राऊत यांनी मुंबईत येऊन दाखवा, असे विधान केलं होतं. आम्ही खुलेआम त्यावेळी वरळीतून वाजत गाजत गेलो. त्यावेळी काय झालं? संजय राऊत जे बोलतात त्याचं अर्ध वाक्य जरी खरं ठरलं तरी आम्ही म्हणाल ते ऐकू, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.


Election Commission : 96 लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या. निवडणूक आयोग कारवाई करेल


राज ठाकरे यांनी 96 लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती. याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिल आहे. राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे. अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबींनी आढळून आल्या तर अहवाल मागितला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल. असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.


आणखी वाचा