मुंबई : गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (SC) आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालायने नव्या प्रभार रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका (Election) या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे, आता लवकरच राज्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. तर, आधी झेडपी अन् पंचायत समितींच्या निवडणुका होतील, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील या निकालाचे दोन अर्थ आहेत. मागील निर्णयात जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या असे न्यायालयाने सांगितले होते, तेच डायरेक्शन आता कन्फर्म झाले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण पूर्णपणे या निवडणुकीत राहणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर,  सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच निवडणूक होतील. त्यामुळे, राज्य सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

आधी झेडपी अन् पंचायत समिती निवडणूक

राज्यातील नगरपालिका महानगरपालिका यांच्या प्रभाग रचनांचे काम जवळपास पूर्ण झाले असून 6 तारखेला राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे हे दाखल करतील, अशी माझी माहिती आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका यांच्या निवडणुका घेतल्या जातील, असा अंदाज असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल आल्यानंतर संजय शिरसाट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यातील औसा येथून याचिका

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य शासनाने नवीन प्रभाग रचना 10 जून 2025 रोजी जारी केली होती. त्यानुसार या नवीन प्रभाग रचना पूर्ण होण्यासाठी 110 दिवसांचा वेळ लागणार होता. सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याबाबत 6 मे 2025 रोजी आदेश दिला होता. मात्र, नवीन प्रभाग रचनेला वेळ लागणार असल्यामुळे नवीन प्रभाग रचना संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. नवीन प्रभाग रचनेला जास्त वेळ लागत असल्याने लवकरात लवकर निवडणुका होण्यासाठी नगरपालिकेची जुनी प्रभाग रचना होती, त्या जुन्या  प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यात याव्यात, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी ही याचिका दाखल केली होती. 

हेही वाचा

आमची 51 टक्के मतांची तयारी झालीय, ठाकरेंच्या युतीवर भाजपचे प्रत्त्युत्तर; बावनकुळेंनी सांगितलं निवडणुकांचं गणित