सातारा : पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून साताऱ्यात मात्र रोज नवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीची अद्यापही गुलदस्त्यात असलेली भूमिका तर दुसरीकडे भाजप अंतर्गत असलेली कुरबुर (Satara Politics) यामुळे या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात (Satara Politics) महायुतीच्या उमेदवाराबाबत चिंतेचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, आमदार धैर्यशील कदम साताऱ्यात भाजपने घेतलेल्या मेळाव्याला अनुपस्थित होते ; तर खासदार उदयनराजे यांनी मेळाव्यामध्ये बोलणं टाळलं यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.(Satara Politics)

Continues below advertisement

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी उमेदवारीवरून निर्माण झालेला संभ्रम अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्या उमेदवारीनंतर साताऱ्यात महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता साताऱ्यात भाजपकडून घेण्यात आलेल्या मेळाव्यात भाजप नेत्यांची अनुपस्थिती आणि खासदार उदयनराजेंनी मेळाव्याला बोलणं टाळल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे.(Satara Politics)

साताऱ्यात भाजपने घेतलेल्या  मेळाव्याला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे आमदार धैर्यशील कदम या दोन नेत्यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले आहे. त्यातच भाजपचे खासदार उदयनराजे यांनी देखील या जाहीर मेळाव्यात बोलणे टाळले त्यामुळे नेमकं साताऱ्यात भाजपमध्ये अंतर्गत कुरबुर सुरू आहे का ? असा सवाल मेळावा नंतर उपस्थित केला जात आहे. त्यातच साताऱ्यातील मेळाव्याला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार धैर्यशील कदम अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमागे उमेदवारीवरून नाराजी आहे का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दुसरीकडे, खासदार उदयनराजे भोसले यांनीही मेळाव्यात बोलणं टाळल्याने पदवीधर आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या स्मिता जाधव यांना या अंतर्गत मतभेदांचा फटका बसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता महायुतीची एकजूट नसल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.त्यामुळे आता साताऱ्यातील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहील आहे.

Continues below advertisement

Election Schedule: निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026

अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026

मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)

मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026

Maharashtra Vidhan Parishad Election: रिक्त झालेल्या जागा

1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)

2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)

3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)

4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना - शिंदे गट)

5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)