Sanjay Raut on Praful Patel : वक्फ विधेयकावरून (Waqf Amendment Bill 2025) राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा बाबरी पाडण्याचे श्रेय अभिमानाने घ्यायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी ते केले, असे म्हणायचे, पण आता सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. पहिल्यांदा संजयभैय्यांचे भाषण नरोवा कुंजरोवा होते. रोज फाडफाड बोलत असतात. आज काय बोलू काय बोल नये, हे समजत नव्हते. संजयभैय्या तुम्ही रंग बदलू नका, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवचले. तर तुम्ही भिऊन बाजू बदलली आहे. आम्ही भिऊन तिकडे गेलो नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता. आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.
संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी बापाच्या पाठीत खंजीर खुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतो. ज्या प्रफुल्ल पटेलांवर मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली. त्यांच्या संपत्या जप्त झाल्या. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधांसह भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शाह यांनी त्यांना आपल्या पक्षात ठेवून घेतले. प्रफुल पटेल संसदेत आहेत याची आम्हाला लाज वाटते. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षात घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.
माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन
संजय राऊत पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलं आहे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत होते. मग दाऊदची दलाली केली असे वाटते. इथे आल्यावर त्यांची हजार कोटीची संपत्ती मोकळी झाली, अशा लोकांनी संसदेत उभे राहून बोलण्याची लायकी तरी आहे का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. कोणता रंग आहे? तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन, असा घणाघात त्यांनी केला.
...तर त्यांना महाराष्ट्र सोडून द्यावा लागेल
हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून द्यावा लागेल. हे कायम वाकलेले लोक आहेत. त्यांना पाठीचा कणा नाही. भाजपचे लोक अशांना खांद्यावर घेतात. मोदी- शाहांचे बूट चाटून क्लीनचीट मिळवली आहे. भ्रष्टाचाराऱ्यांना सोबत घेऊन बहुमत मिळवलं आहे, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.
आणखी वाचा