मुंबई : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद केले आहे. राजदीप सरदेसाई यांच्या 2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीत असे म्हणण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


संजय राऊत म्हणाले की, भुजबळ, सरनाईक, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी काय म्हणतात याला आता अर्थ नाही, ईडीपासून बचाव करण्यासाठी, कातडी वाचवण्यासाठी हे पक्ष सोडून गेले. तसे नसते तर इतर अनेकांच्या प्रॉपर्टी मोकळ्या झाल्या नसत्या. आता अनेक फाईल कपाटात बंद करून टाकल्या आहेत. आता त्यांना भीती नाही कारण सरकार बदलले, मागच्या 2 वर्षात त्यांनी हवे ते करून घेतले.  


म्हणून त्यांनी आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला


मुलुंडच्या पोपटलालने अनेकांना तुरुंगात टाकण्याचा डाव केला होता, पण आता ते चूप आहेत. आता लपावलापावी कशाला करता, मी नाही त्यातली कडी लाव आतली असे का? छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले. त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आला. प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून त्यांनी आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. 


ईडीचा दबाव पक्ष फोडीमागचे मुख्य हत्यार 


संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्यावरही दबाव होता मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. अनिल देशमुखांवर दबाव होता. रवींद्र वायकर पळून गेले. वायकर हे बोलू शकतात का त्यांच्यावर दबाव नव्हता, ते आता तिकडे गेले. दबाव हा होता की शिवसेनेला सोडायचे आणि भाजप सोबत जायचे. ते खंजीर द्यायचे आणि कुठे खुपसायचे हे सांगायचे. ईडीचा दबाव हे पक्ष फोडीमागचे मुख्य हत्यार होते, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केली.  


नेमकं प्रकरण काय? 


'दैनिक लोकसत्ता'मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकातील मुलाखतीत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ असे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे. 


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता; छगन भुजबळांच्या दाव्याने नवे वादळ