Sanjay Mandlik, कोल्हापूर : माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे राजकीय पुनर्वसन लवकरच होणार असल्याची चर्चा सुरु झालीये. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना विधान परिषद किंवा राज्यसभा  यापैकी एक गिफ्ट मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी शिवसेना पक्षाच्या विस्तारासाठी काम सुरू केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय मंडलिक यांच्यावर विधानसभेची जबाबदारी टाकली होती... त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच्या सर्व आमदारांची मोट बांधण्याची जबाबदारी देखील संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यावर होती. ही जबाबदारी संजय मंडलिक यांनी योग्य पद्धतीने पार पाडल्यामुळे संजय मंडलिक यांचं पुनर्वसन पक्कं झालं आहे.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये महायुतीला मोठं यश 

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 10 पैकी शिवसेनेच्या 3 जागा आणि उर्वरित 7 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान संजय मंडलिक यांनी दिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देखील संजय मंडलिक यांनी लक्ष वेधून घेतले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय मंडलिक यांच्या कामावर खुश आहेत. त्याचंच बक्षीस म्हणून संजय मंडलिक यांची विधान परिषद किंवा राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

2024 च्या  कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या खासदार संजय मंडलिक यांचं दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचं स्वप्न खंडित केलं होतं. शाहू महाराजांच्या रूपाने संसदेमध्ये कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील छत्रपती घराण्याला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व मिळालं होतं. त्यांच्या विजयानंतर मतदारसंघात गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला होता.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली होती. खासदार संजय मंडलिक यांचा मतदारसंघाची संपर्क नसल्याने त्यावरून नाराजी व्यक्त केली जात होती. भाजपने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ते पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे उमेदवारी बदलली जावी अशी ही मागणी होत होती. तथापि मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कोल्हापूर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेऊन संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेस पक्षाने ऐनवेळी श्रीमंत शाहू महाराज यांना रिंगणात उतरवले. काँग्रेसची ही खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून पाहायला मिळाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nanded : लोकांनी उपचारांसाठी तुमच्या निधीची वाट पाहायची का? नांदेड रुग्णालय मृत्यूतांडव प्रकरणी हायकोर्टाचा सरकारला सवाल