Sambhaji Raje Chhatrapati and Manoj Jarange :  येत्या विधानसभा निवडणुकीत स्वराज पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्याशी संबंध नसणार असल्याचा खुलासा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज (दि.14) केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचे सांगत या विधानसभेला तिसरी आघाडी करण्याची शक्यता संभाजीराजे यांनी बोलून दाखवली. स्वराज्य पक्षाचे नेते महादेव तळेकर यांनी आज भोसे येथे आयोजित केलेल्या महामंडळ महाएक्स्पो सोहळ्याच्या उदघाटनाला आले असता संभाजीराजे बोलत होते. यावेळी राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते. मनोज जरांगे यांचा दृष्टीकोण आणि माझ उद्दिष्ट एक असल्याचे सांगत मनोज जरांगे, संभाजी राजे छत्रपती विधानसभेला एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 


महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत जाण्याचा प्रश्न नाही


महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत जाण्याचा प्रश्न नाही. आरक्षण देण्यापेक्षा ते आरक्षण कसं टिकेल  यावर चर्चा होणे  गरजेचे असल्याचे संभाजीराजे म्हणाले. यापूर्वी दोन वेळा आरक्षण मिळाले आहे मात्र टिकले नाही. राज्यात मराठा ओबोसी समाजात वाद निर्माण झाले नाही पाहिजे यांची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असेही संभाजीराजे म्हणाले. 


मनोज जरांगे पाटील काय काय म्हणाले? 


लोक उद्यापासून येतील. सर्व जाती धर्माच्या लोकांनी डाटा घेऊन यावा. सगळ्या लोकांशी चर्चा करणार आहोत. आता ज्यांना लढायच आहे त्यांनी कागद पत्र तयार ठेवावे. आता सरकारची भूमिका फक्त कारणे सांगायची आहे. काल सरकारला दिलेल्या कालावधीचे दोन महिने झाले आहेत. आता आम्हाला आरक्षणाची आशा सोडावी लागणार आता यांना आरक्षण द्यायचं नाही. फक्त आशेवर ठेवायचं आहे. आता मराठ्यांनी ठरवलं आहे यांना खुर्ची ठेवायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 


पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नितेश राणेंना देवेंद्र फडणवीस एकटे पडत चालले असे म्हणायचे असेल समाज एकता पडू शकत नाही. त्यांनी फडणवीस यांना सांगावं आरेक्षण देऊन टाकावं. 29  तारखेपर्यंत जर यांनी आरक्षण दिले नाही तर मग 29 ला निर्णय घेणार आहोत.  शंभूराजेंशी काही बोलणं झालं नाही आता त्यांना 29 तारखेपर्यात वेळ दिला आहे. आमच्या 5 ते 7 मागण्या त्यांना दिलेल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर रेटत आहे. आम्हाला हे वेड्यात काढत आहेत, फसवत आहेत.  हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. 


तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग आम्हाला तुम्हाला पाडावे लागणार


तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग आम्हाला तुम्हाला पाडावे लागणार. सरकार सोबत आता कोणतीही चर्चा झाली नाही. उभे करायचे की पडायचे हे ठरवू पण यांची खुर्ची घालवणार आहोत. अधिवेशन आचारसंहिता असा यांचा वेळकाढूपणा आणि रंगेलपणा सुरू आहे. सुप्रिया सुळेंना जाब विचारू नका. त्यांना 2024 ला कायमची भूमिका विचारू हे आपल्याला काम लावत आहेत.  आपण यांचे नोकर आहेत का? लोकांचा यांच्यावर राग असणारच सगळा रोष 2024 ला दाखवू, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं. 


आरक्षण द्यायला 12 महिने लागत नाही हे आरक्षण देत नाही असा अंदाज दिसत आहे. भुजबळच्या नादात तुम्ही सत्त्ता घालवून बसणार,आम्ही सगळ्या तयारीला लागू. तुमचा कार्यक्रम लावू दरेकर हा खादाड भूत आहे, हा सगळ्यात वेगळा आहे. हा सत्त्ताच मागतो तो तरसलेला भूत आहे. सगळे लोक दरेकर यांच्यामुळे आंदोलन करत आहे,दरेकर अनेकांच्या अंगात घुसला आहे. आम्हीही एक लाख लोक उपोषणाला बसणार होतो,तयारीला लागलो होतो. आरक्षणासाठी त्यांचं उपोषण आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. मी सुद्धा एक दोन दिवस त्यांच्या उपोषणात बसणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.