बुलढाणा : रेव्ह पार्टी म्हणजे दोन-तीन हजार लोक एकत्र येऊन पार्टी करणे होय, या अगोदरच्या बातम्या आम्ही ज्या वाचल्या, जे आम्हाला समजतंय, त्यानुसार रेव्ह पार्टी 2-3 हजार लोकं एकत्र येऊन पार्टी करणे आहे. आता हे चार पाच-सहा लोक एकत्र येऊन पार्टी करत होते, कोर्टाने सुद्धा सांगितले की याला रेव्ह पार्टी म्हणू नका, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव रोहित पवार (Rohit pawar) यांनी पुण्यात (Pune) आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयांकडून झालेल्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसचे, प्रफुल लोढा या व्यक्तीने अनेकांचे हनी ट्रॅप केलेले आहेत, त्याच्याकडे ते व्हिडिओ आहेत. सत्तेतील एका मोठ्या नेत्याचा हा माणूस आहे आणि तो अनेकांना ब्लॅकमेल करायचा, असे म्हणत रोहित पवारांनी लोढा प्रकरणावर लक्ष केंद्रीत झाल्यानेच खडसेंच्या (Eknath khadse) जावईप्रकरणात राजकीय वास येत असल्याचे म्हटले.  

अंधेरीला जो गुन्हा नोंद आहे, त्याची माहिती लोकांसमोर का येत नाही? अंधेरीचा एफआयआर लोकांसमोर येणे गरजेचे आहे. कारण, खडसेंच्या जावयाच्या कारवाई प्रकरणात राजकारणाचा वास येतो आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांच्या जावयावरील कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेच पवार यांनी सूचवले आहे. बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांनी विविध विषयांवर भाष्य करताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

खडसेंच्या जावयाच्या बाबतीत पोलीस लक्ष ठेवत होते, माझ्यावर तर ईडी व सीबीआयचं लक्ष आहे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडले की आमच्यावर गुन्हा दाखल होतो. खडसे साहेबांच्या जावयाच्या बाबतीत काही व्हिडिओ पोलिसांकडे होते ते न्यायालयात देणे आवश्यक असताना माध्यमांकडे कसे दिले. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी काहीतरी सेटअप करायचं आहे, असं राजकारण यापूर्वी युपी-बिहारमध्ये चालायचं, असेही रोहित पवार यांनी म्हटले. 

तीन महिन्यात 770 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या

सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडत आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यात 770 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली म्हणजे दिवसाला आठ आणि तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याने सोयाबीन 3800 रुपयाला, कापूस 6 हजारांना विकला. मात्र, ज्या मंत्र्यावर ही जबाबदारी असते ते माणिकराव कोकाटे मंत्रीपद असताना पत्त्याचा गेम खेळतात. हे सरकार असंवेदनशील आहे, त्या मंत्राचा आज राजीनामा घेतल्या जाईल अशी अपेक्षा देखील रोहित पवार यांनी बोलून दाखवली. दरम्यान, अजित दादांनी त्यांच्याशी चर्चा केली, दम दिला, मिठी मारली हे सगळं ठीक आहे. पण आज राजीनामा घेतल्या गेलाच पाहिजे. एखादा होतकरू व तरुण कृषिमंत्री या राज्याला हवा आहे, असेही पवार म्हणाले 

हेही वाचा

मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय