मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उदय सामंत (Uday Samant) यांनी चाकण एमआयडीसीत राजकारण आणण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याची टीका केली होती. रोहित पवार यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.  उदय समंत राजकीय उद्योगात जास्त बिझी असतात त्यामुळे एमआयडीसीतील लोकांसाठी काय केल ते सांगावं, असा सवाल रोहित पवार यांनी केला. चाकण एमआयडीसीत रविवारी जाऊन बैठक घेतली. आम्ही आधी गेलो विषय मांडला आणि आता रविवारी आपण तिथ गेला आहात. उद्योजकांनी प्रेस घेतल्यानं गडबड झाली मग तुम्ही रविवारी तिकडे गेलात, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होतात का? असा सवाल रोहित पवार यांनी उदय सामंत यांना केला.

Continues below advertisement

उदय सामंत रविवारी चाकणमध्ये  

रोहित पवार पुढे म्हणाले की, उद्योगमंत्री म्हणतात MIDC ला जागा देऊ आणि तिथ घरकुल बांधा म्हणजे तुमचे कर्मचारी तिथेच राहतील, असलं सोल्युशन देतात काय? पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही सोल्यूशन काय काढत आहात तर ते म्हणाले आधी मी काय बोललो तेच विसरुन गेलो. उदय सामंत यांनी केवळ मोघम बोलण्याचं काम केल आहे. केवळ आश्वासने त्यांनी दिली आहेत. आज ते रविवारी गेले आहेत त्यामुळे ते वेळेत पोहचले असतील. आता उद्यापासून काय होणार ते पाहावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं. 

उदय सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री पाच वर्षांपासून आहेत. ते राजकीय उद्योगात जास्त असतात. व्यावसायिक आणि लोकांसाठी काय केले ते त्यांनी सांगावे. उद्योजकांनी चाकण एमआयडीसीतील अडचणींबाबत प्रेस घेतली, त्यानंतर गडबड झाल्यावर उदय सामंत चाकणमध्ये रविवारी जर जातात, एवढे दिवस काय गोट्या खेळत होते का असा सवाल रोहित पवार यांनी केला. रस्त्यांची आणि इतर कामं 10 महिन्यात करण्याची आश्वासनं दिली आहेत, ते काय काय करतात ते आम्ही पाहू, असं रोहित पवार म्हणाले.  

Continues below advertisement

उद्योगमंत्र्यांनी ते काय करणार हे सांगणे म्हत्वाचे आहे. आज नुसतीच चर्चा झाली,मोघम बोलणं झालं. आम्ही हा रस्ता करू तो रस्ता करू  हा आश्वासनाचा पाऊस झाला आहे.  रविवारी ते गेले आहेत आणि लवकर पोहोचले असतील पण काय करणार आहात ते त्यांनी सांगितलं पाहिजे. उदय सामंत येणार म्हणून डांबर टाकून रस्ते नीट केले आहेत. चाकणमध्ये 30 टक्के वाढ ते म्हणालेत, आमचं त्यांना ओपन चलेंज आहेत, आकडेवारीनुसार त्यांनी दाखवून द्यावं, असं रोहित पवार म्हणाले.