Rohit Pawar On Praful Patel : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने 2017 पासून चालवण्यात आलेला भ्रष्टाचाराचा खटला आज (दि.28) बंद केला आहे. या प्रकरणी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आज खटल्यात प्रफुल्ल पटेलांना क्लिनचीट मिळाली आहे. पटेलांना क्लिनचीट मिळाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेलांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. 


काय म्हणाले रोहित पवार?


रोहित पवार त्यांच्या ट्वीटमध्ये लिहितात, "ज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला आणि नंतर अजितदादांच्या कानी लागून सातत्याने पाठपुरावा केला ती CBI ची #क्लिन_चीट अखेर भावी 'लेखकांना' मिळाल्याचं दिसतंय. अनेक दिवसांपासून लोकांसाठी सकारात्मक बातम्या येत नसल्या तरी आजची बातमी बघून प्रफुल्ल पटेल साहेबांना ‘मिर्ची’ही गोड लागेल. या गोड बातमीबद्दल प्रफुल पटेल साहेबांचं अभिनंदन!"




इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : ठाणे नाही तर मग कल्याण द्या, श्रीकांत शिंदेंना ठाण्याला पाठवा; भाजपच्या आग्रहापुढे एकनाथ शिंदे कोणती जागा गमावणार?