Ram Shinde & Rohit Pawar: कुख्यात गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला, असा खळबळजनक आरोप विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला. काही दिवसांपूर्वी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राम शिंदे आणि गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केली, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी मंगळवारी 'एबीपी माझा'शी बोलताना रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

Continues below advertisement

रोहित पवार हे बिनसलेले व्यक्तिमत्व असून ते दररोज खोटं बोलण्याचे काम करतात. निलेश घायवळ प्रकरणात रोहित पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. मात्र, ते आता तोंडघशी पडले आहेत. निलेश घायवळ यांना अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवार यांनीच पासपोर्ट मिळवून दिला होता. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी रोहित पवार यांनीच निलेश घायवळ याला प्रचारात उतरवले होते. माझा आणि निलेश  घायवळचा दूरपर्यंत एकमेकांशी संबंध नाही, असे राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांनीच घायवळला 2019 साली कर्जत-जामखेडमध्ये त्यांच्या स्वार्थासाठी आणले. मला पाडण्यासाठीच रोहित पवारांनी घायवळला निवडणुकीच्या प्रचारात आणले. रोहित पवार यांचे वडील निलेश घायवळच्या घरी गेले होते, त्यांना बोलावलं. या सगळ्यांच्या मगरपट्ट्यात बैठका झाला. मात्र, नंतर त्यांचं व्यवहार की जमीन व्यवहार कशावरुन बिनसले, ते मला माहिती नाही. मात्र, रोहित पवार यांचे निलेश घायवळ यांच्याशी कौटुंबिक संबंध होते, रोहित पवारांच्या आई-वडिलांसोबत निलेश घायवळचे फोटो आहेत. त्यांचे फोटो दाखवले तर ते समाजकार्य होते, दुसऱ्यासोबत फोटो निघाले की ते गुंड होतात. रोहित पवार यांचे हे वर्तन चुकीचे आहे. तानाजी  सावंत, चंद्रकांत पाटील आणि मी निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केली, हा रोहित पवारांचा आरोप धादांत खोटा आहे. 2020 निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला होता. घायवळच्या मामाने स्पष्ट सांगितले आहे की, रोहित पवारांनी अनिल देशमुखांच्या माध्यमातून हा पासपोर्ट मिळवून दिला. महाविकास आघाडीच्या काळात घायवळला पासपोर्ट दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत, असे राम शिंदे यांनी म्हटले.

Continues below advertisement

आणखी वाचा

रोहित पवारांनी निलेश घायवळचं राजकीय कनेक्शन उलगडून सांगितलं, बड्या नेत्यांची नावं, धक्कादायक गौप्यस्फोट