मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) धादांत खोटं बोलतात. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी संजय राऊतांवर केला आहे. 2019 साली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले. मात्र, रश्मी ठाकरे (Rashmi Thackray) यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.
उमेश पाटील म्हणाले, 2019 साली जाणीवपूर्वक शरद पवार यांनी अजित पवार व्हिलन होतील अशी भूमीका घेण्यात आली होती. कारण त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच होतं त्यावेळी एकनाथ शिंदे यांना करणार होते. मात्र रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांना करावं असं ठरलं. परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळेच भाजपसोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. अजित पवार यांना क्षमा करून उपमुख्यमंत्री केलं असा दावा करतात. परंतु शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं लागलं कारण सर्व आमदारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली होती.
पक्षात दुसरे नेतृत्व नको म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही
उमेश पाटलांनी अनेक गौप्यस्फोट केले आहे. उमेश पाटील म्हणाले, 2004 साली शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही. याच कारण शरद पवारांनी संगितले ही, त्यावेळी अजित पवार वेळा खासदार आणि 2 वेळा आमदार होते याचाच अर्थ ते सक्षम नेते होते. त्यावेळी मातब्बर मंडळी आमच्याकडे होती मात्र तरीदेखील शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही. भविष्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद द्यायचं असेल तर त्यासाठी दुसरं नेतृत्व पक्षात नको म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही.
मतदान कमी का झाले? यासाठी चौकशी समिती नेमली पाहिजे : उमेश पाटील
उद्धव ठाकरेंच्या मतदानाच्या दिवशीच्या आरोपावर उमेश पाटील म्हणले, उद्धव ठाकरे यांचे नेहमीचं रडगाणे आहे. उद्धव ठाकरे यांना जर यंत्रणेवर विश्वास नाही तर कोणत्या आधारावर तुम्ही छाती टोकून सांगत आहे की आमच्या जास्त जागा येतील . मतदान हे जास्तीच व्हायला पाहिजे ते कमी का झाले याची चौकशी व्हायला समिती नेमली आहे.
हे ही वाचा :