Ranjeetsinha Naik-Nimbalkar on Dhairyasheel Mohite Patil and Sharad Pawar : काही लोक न बोलावतात जातात, तर काही काही मुद्दाम बोलावतात. त्याचा परिणाम एखाद्याला वैयक्तिक राजकीय फायदा होत असला तरी कोण कोठे गेले आणि कोण कोठे आले? यावरुन लोकांच्या जीवनावर परिणार होणार नाही, असं म्हणत भाजप खासदार रणजित निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी माढा व सोलापूर लोकसभेच्या उमेदवारासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलं होता. यानंतर खासदार निंबाळकर बोलत होते. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते हे देखील उपस्थित होते. 


धैर्यशील मोहिते पाटील रविवारी (दि.13) चार वाजता जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवारही उद्या अकलूज दौऱ्यावर आहेत. शरद पवार , सुशीलकुमार शिंदे व राज्यातील इतर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी भोजनासाठी येणार आहेत. शरद पवारांच्या अकलूज दौऱ्यावरुनच रणजित निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय. 


शरद पवार यांच्या येण्याने काहीच फरक पडणार नाही


रणजित निंबाळकर म्हणाले, शरद पवार यांच्या येण्याने काहीच फरक पडणार नाही. शरद पवार माढ्याचे खासदार असताना त्यांचा कार्यकाळ सर्वांनी अनुभवाला आहे. त्यामुळे पवारांच्या येण्याने अथवा जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही. ते पाच वर्षे येथे आले होते त्यावेळी त्यांचा मतदारसंघातील परिणाम सगळ्यांना माहित आहे, असा टोलाही रणजित निंबाळकर यांनी लगावला. 


शरद पवार यांनी केलेली कामे सर्वांना माहिती आहेत


गेल्यावेळी म्हणजे 2019 साली मी शरद पवार यांच्याच विरोधात माढा लोकसभेची निवडणूक लढविणार असं जाहीर करून उमेदवारी घेतली होती. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केल्याने ही लढत होऊ शकली नव्हती, असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून शरद पवार यांनी केलेली कामे सर्वांना माहिती आहेत, त्यामुळे  त्यांच्या येण्या जाण्याच्या माढा मतदारसंघात काही फरक पडणार नाही,असा टोला निंबाळकर यांनी लगावला.


कोणी आव्हान दिले तर त्याच्यापेक्षा डबल आक्रमक होतो


मी विकासाच्या कामावर आक्रमक असतो.  कोणी आव्हान दिले तर त्याच्यापेक्षा डबल आक्रमक होतो, असेही निंबाळकर यांनी सांगितले . मी गेल्यावेळी खासदार झालो तेव्हाही रामराजे निंबाळकर हे माझ्या विरोधातच होते. मात्र आता ते महायुतीचे घटक असल्याने त्यांनी महायुतीच्या मागे उभे राहावे ही लोकांची अपेक्षा असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Mahadev Jankar on Sanjay Jadhav : बंडू छोटा माणूस, त्याला इंग्रजी कळत नाही, माझ्या नादी लागू नको, महादेव जानकरांचं भाषण ऐकाच