Continues below advertisement

मुंबई : उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परबांनी (Anil Parab) अकलेचे दिवे पाजळले आहेत, योगेश कदम याला नेहमी टार्गेट केले. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. उद्धव ठाकरे यांना भेटून योगेश कदम यांनी मला त्रास दिला जात असल्याचे म्हटले होते. योगेश कदम मंत्री झाल्याने यांना पोटशूळ उठले, असे म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांचे वडिल आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुण्यातील घायवळ प्रकरणावर भाष्य केले. सध्या निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवान्यावरुन राजकीय वादळ उठले असून शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर, रामदास कदम (Ramdas kadam) यांनी आणि योगेश कदमांनी पुढे येत बाजू मांडली.

कुठलीही केस घायवळवर नव्हती, तो शिक्षक, बिल्डर असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. पण, तो काय तुला विचारून निर्णय घेणार का, असा सवाल रामदास कदम यांनी अनिल परबांना उद्देशून केला. मी पण गृहाराज्यमंत्री होतो, गृहराज्यमंत्र्यांना अधिकार असतात. त्याच्यावर एकही केस नाही, कुठलाही गुन्हा नाही. तो शिक्षक असेल, बिल्डर असेल, कोर्टाने त्याला क्लिन चीट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो, असे रामदास कदम यांनी म्हटले. तसेच, योगेश कदमला मी याबाबत विचारले, तेव्हा विधिमंडळातील एका मोठ्या पदावर बसलेल्या, मंत्र्‍यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीने त्याला सांगितलं. ज्यांनी योगेश कदम यांना सांगितलं तेही न्यायाधीशच आहेत. त्यांचं नावही योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्‍यांना पाठवलं आहे. पण, अशा व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला, असे म्हणत रामदास कदम यांनी विधानसभा सभापती राम शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.

Continues below advertisement

न्यायालयाने 2019 मध्ये क्लिन चीट दिली होती

घायवळ परवानाप्रकरणी योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांना कदाचित माहिती नसेल परवाना देताना ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू केलं जातं. याबाबत सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईल. मी सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिलंय. मी या खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला परवाना देण्याबाबत माझ्याकडून शिफारस झालेली नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आजपर्यंत आमच्याकडून कधी झालेलं नाही, यापुढेही कधी होणार नाही, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी म्हटलं. म्हणून, जे काही गुन्हे दाखल होते, तरीही लायसन्स कसे दिले ह्या सर्व आरोपांची माहिती मी लवकरच देईन.

मी सबकॉन्सिय माईंडने निर्णय घेतला

जेव्हा अपील केली जाते, ती वैयक्तिक अपील असते. त्यामुळे, शेवटी त्या वक्तीचं कॅरेक्टर कसं आहे हे पाहिलं जातं. सचिन घायवळवरती 15-20 वर्षांपूर्वी जे गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्यातून 2019 मध्ये न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये, सेटलमेंटसुद्धा नाही, हे सगळे लक्षात घेऊनच मी सद्सद् विवेकबुद्धीने हा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरणही योगेश कदम यांनी दिले आहे.

हेही वाचा

Video: मी सब कॉन्सियस माईंडने निर्णय घेतला, घायवळच्या बंदुक परवान्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण