Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2025) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. मात्र, या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता रामदास कदम यांना स्वतःचेच शब्द गिळण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. 

Continues below advertisement


Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: रामदास कदमांवर स्वत:चेच शब्द गिळण्याची वेळ


रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य मला करायचे नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. उद्धव ठाकरेंनी मला सांगितले होते की हाताचे ठसे.... आपण घेतो ना. छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील पायाचे ठसे घेतलेले आहेत. तसेच आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय? परंतु त्यांना (अनिल परब) असे वाटते की, मी स्वीस बँकेसाठी ते बोललो आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कदापि येणार नाहीत. मी फक्त संशय व्यक्त केला होता. संपला विषय माझा. बाळासाहेबांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही, आमचे ते दैवत आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी माघार घेतली. 


Ramdas Kadam : रामदास कदमांचा गौप्यस्फोट


दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. यावरून रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केलाय. ते म्हणाले की, मी योगेश कमदला विचारलं, विधिमंडळाच्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेत विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीने त्याला सांगितलं, तो पण न्यायाधीशच आहे. योगेश कदमने सांगितले तो न्यायाधीशच आहे, मला नवा घ्यायचं नाही. त्याचं नाव योगेश कदमने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. ती मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने शिफारस केल्यानंतर ही व्यक्ती स्वच्छ असेल, म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. कागदपत्र होते, असे म्हणत  रामदास कदम यांनी विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदेंकडे अंगुलीनिर्देश केले. आता रामदास कदमांच्या आरोपावर राम शिंदे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 



आणखी वाचा 


Shiv Sena Party Symbol MLA Disqualification Case: मोठी बातमी : पक्ष-चिन्हांसोबत आमदार अपात्रतेचाही निर्णय, शिवसेनेच्या सर्वात मोठ्या सुनावणीची तारीख ठरली, दिवाळीनंतर कोणाचे फटाके?