सोलापूर : माढ्यात (Madha Lok Sabha Election)  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या (Ramdas Athawale ) कवितेमुळे प्रचारात वेगळीत रंगत चढल्याचं पाहयला मिळालं. माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जोरदार एन्ट्री झाली . माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे झालेल्या सभेत आठवले यांनी आपल्या खुमासदार कवितेतून वातावरण हलके फुलके केले .  मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना  ते म्हणाले,  मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा 10 वर्ष मला निवडून आणण्यात होता मोठा वाटा , पण आता तुम्हीच काढा तुतारीचां  काटा  असे सांगितले . यावेळी त्यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली आहे. यावेळी भाजप उमेदवार खासदार रणजित निंबाळकर , राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे , भाजप आमदार प्रसाद लाड आणि रीपाई व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 मी गेली 8 वर्षे मोदी सरकारमध्ये मंत्री असलो तरी माझ्या पक्षाला काही जागा मिळाली नसल्याची कोटी त्यांनी केली. मोदी सरकार हे खरे संविधानाचे रक्षक असून विरोधकांकडून संविधान बदलण्याचा खोटं प्रचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले . कर्नाटकमधील भाजपाच्या हेगडे यांनी याबाबत वक्तव्य केल्यावर त्यांना टेंभी देवून त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याचेही आठवले यांनी सांगितले . 


मजबूत करायचा आहे रणजीत नाईक निंबाळकर यांचा वाडा, म्हणून मी आलो आहे माढा: रामदास आठवले


  यावेळी आपल्या भाषणात त्यांनी इन्स्टंट कविता करत सगळ्यांना हसवले . आपल्या भाषणात उमेदवार रणजित निंबाळकर यांच्यावर कविता करताना म्हणाले,  मला मजबूत करायचा आहे रणजीत नाईक निंबाळकर यांचा वाडा, म्हणून मी आलो आहे माढा.... महविकास आघाडीला टोला लगवताना महाविकास आघाडीचा बुरखा टरा टरा फाडा ,राहुल गांधीच्या इंडिया आघाडीला गाढा.. असे सांगितले .  बारामतीच्या जागेबाबत बोलताना म्हणाले, आतापर्यंत होती शरद पवारांची बारामती, पण आता ती जाणार अजितदादांच्या हाती म्हणत रामदास आठवले यांनी  हास्यकल्लोळ उडवला आहे.


आठवलेंच्या या कवितांची सोशल मीडियाच चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही मोदींच्या विधानाचा संदर्भ देत आपल्या काव्यमय शैलीत फटकेबाजी केली आहे. यावेळी टाळ्यांचा गडगडाट झाला.


हे ही वाचा :


''नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा...''; शरद पवारांवरील टीकेवर आठवलेस्टाईल काव्यमय फटकेबाजी