Ramdas Athawale on Walmik Karad and Dhananjay Munde, Pune : "वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहीजे. त्यांच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल करा. संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडला आरोपी केले नसेल तर ते चुकीचे आहे. त्यांना फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करुन थांबू नये. कराडच्या सांगण्यावरुनच इतर आरोपींनी खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. त्यांचे तसे कॅाल रेकॅार्ड समोर आले आहेत त्यामुळे त्यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ॲाफीस ॲाफ प्रॅाफीटचा आरोप केला आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे", असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- भिमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभ या स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम जमीन संपादनामुळे रखडले आहे.
- जात पडताळणीचे साडेतीन लाख अर्ज प्रलंबित आहेत. ते लवकर निकाली काढण्यासाठी मी सुचना केल्या आहेत
- ज्यांना राखीव जागांवर निवडणूक लढवायची आहे त्यांनी आधीच जात पडताळणी केली पाहीजे. अशी आमची मागणी आहे. निवडणुन आल्यावर जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा नियम बदलण्यात यावा
- जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूका लवकर व्हाव्यात. पण सुप्रीम कोर्टात हा विषय आहे. त्यावर निकाल होऊन मे महीन्यात निवडणुका होतील अशी अपेक्षा आहेत
- या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला डावलु नये. आम्हाला ही बरोबर घ्यावे. आम्ही शिंदे आणि अजित पवार यांच्या आधी भाजप बरोबर आलो आहोत
- लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती ला झाला आहे
- पण लाडकी बहीण योजनेचा फायदा काही बांग्लादेशी महीलांनी त्याचा फायदा घेतला आहे. अधिकाऱ्यांनी त्याचा तपास करावा
- महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवल्या पाहिजेत
- रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमिरीकेचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. ते तिथल्या रिपब्लिकन पक्षाकडुन राष्ट्राध्यक्ष झाले आहेत
- बीड मधील घटना दुर्दैवी आहे. ज्याचं नाव आहे आका. त्यावर प्रसंग आला आहे बाका
- बीड घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
- *परभणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू पोलीसांमुळे जबाबदार आहेत. पोलीसांमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे.
- नितीश कुमार आम्हाला सोडून जाणार नाहीत. ते गेले तरी आम्ही त्यांना जाऊ देणार नाही.