Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates:  संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या उद्याच्या विजयी मेळाव्याची तयारी पूर्ण झालीय. वरळी डोम इथे होणाऱ्या या मेळाव्यासाठी शिवसेना आणि मनसे सज्ज झालेत. वरळी डोम इथल्या तयारीचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून आज पुन्हा आढावा घेतला गेला. ठाकरे ब्रँडचं उद्या पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला नव्याने दर्शन होईल. विशेष म्हणजे, एकीकडे मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच आता दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याने ही मनोमिलनाची नांदी समजली जातेय. 

हिंदीच्या मुद्द्यावर सरकारनं दोन्ही जीआर मागे घेतल्यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज (7 जुलै 2025) रोजी विजयी मेळावा काढणार आहेत. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यावर आता आज तब्बल 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला या मेळाव्याची उत्सुकता लागलीय.