Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाला ज्या क्षणांची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत होणार असून या मेळाव्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. दरम्यान या विजयी मेळाव्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक, मनसेसैनिक आणि मराठीप्रेमींची उपस्थिती बघायला मिळत आहे. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विशेष निमंत्रणावर थेट अमेरिकेतील मराठी पाहुणेही या मेळाव्यासाठी दाखल झाले आहे.
अमेरिकेतील मराठी महामंडळात अतिशय आनंद
मराठी विषयीचं प्रेम आणि अभिमान या मेळाव्यातून नव्याने व्यक्त होत आहे अशी आमची भावना आहे. मराठी एकजुटीचं पुन्हा अप्रूप वाटत आहे. अमेरिकेतील मराठीजणांना देखील या मेळाव्याची नक्कीच उत्सुकता असेल. अमेरिकेतील मराठी मंडळात देखील या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला घेऊन अतिशय आनंद आहे आणि ही सूक्त भावना वर्षानुवर्षे होती. तीच भावना आज प्रत्यक्षात अवतरली आहे. याचा खूप आनंद होतो आहे. अशी भावना अमेरिकेतील रहिवासी असलेल्या आणि या मेळाव्यासाठी खास अमेरिकेतून दाखल झालेल्या एका मराठी प्रेमीनी व्यक्त केली आहे.
मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच आता या मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे. आज होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे.
उद्धव ठाकरेचं भाषण होणार सगळ्यात शेवटी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणं होणार, सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे, उद्धव ठाकरे वरळी डोमला पोहोचणार आहेत, यानंतर कार्यक्रम सुरू होणार आहे. सुरूवातीला प्रकाश रेड्डीचं भाषण होईल त्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांचं भाषण होणार आहे..या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचही भाषण होणार आहे. त्यानंतर राज ठाकरेंचं भाषण होणार असून उद्धव ठाकरेचं भाषण सगळ्यात शेवटी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेस नेते आल्यास त्यांनाही भाषणाची संधी दिली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या