Sandeep Deshpande On Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राजकारणात नेहमी होते. आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र मनसेत संभाव्य युतीबाबत नाराजीचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
आज अनेक विषय आहेत, महाराष्ट्रातील काही उद्योग बाहेर जात आहे, दादागिरी सुरु आहे. या मुद्द्यांवर सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. निवडणुका येतात, जातात, पण फक्त एखादा विषय निवडणुकी पुरतं येणं, करंटेपणा आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला. सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे...मग ठाकरे बंधूच का?, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. (Sandeep Deshpande On Raj Thackeray And Uddhav Thackeray)
...मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का?, संदीप देशपांडेंचा सवाल
महाराष्ट्रद्रोही कोण? हे विचारण्याचा अधिकार देखील उद्धव ठाकरेंना नाही. भोंग्यांसाठी आमच्यावर 17 हजार केसेस टाकल्या जातात, मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का?, कावेरीसाठी तामिळनाडूतील पक्षातील एकत्र येतात, मग आपण का नाही?, असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला. आज आम्ही हिंदी भाषेसाठी आंदोलन करतोय, अशात त्यांनी आमच्यासोबत आंदोलन करावं, आम्हाला पाठिंबा द्यावा, असं संदीप देशपांडे म्हणाले. उबाठा-मनसे युती इतक्या संकुचीत वृत्तींन ती मुलाखत बघू नका. अरेरावी करणे लोकं, उद्योगांचा प्रश्न मराठी माणसांचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित हा देखील विषय आहे.
...तेव्हा उद्धव ठाकरे वरील मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाहीत- संदीप देशपांडे
2017 साली देखील शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु होती. यासाठी मी देखील या घडामोडीमध्ये होतो. मी त्याचा साक्षीदार सुद्दा आहे. त्यांना वाटलं होतं आम्ही 2017 साली भाजप सोबत जातोय. 2017 ला बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. मात्र तेव्हा उद्धव ठाकरे वरील मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाहीत. महाराष्ट्रासाठी ज्यांना प्रेम आहे, त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ही भूमिका राज ठाकरेंनी मांडली असं मला वाटतं. निवडणुका येतील तेव्हा तो विचार करुया..., असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच आत्ता विषय हिंदी सक्ती, बॅंकांमध्ये हिंदीकरण यासंदर्भात देखील उद्धव ठाकरेंनी भूमिका घ्यायला पाहिजे. पियूष गोयल हे महाराष्ट्रातले खासदार आहे, त्यांना मराठी येत नाही...हे किती दुर्दैव आहे, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.
राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंची प्रतिसाद-
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिलेत. त्याहीपुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती. राज यांची मुलाखत प्रसारित अवघ्या काही तासांतच एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. आपल्याकडून भांडणं नव्हती, मराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला बसणार नाही, याचा निर्णय घ्या, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.