Raj Thackeray: तुम्ही हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न केला, तर दुकानचं नाही शाळाही बंद करणार, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करून गुजरात जवळ नेण्याचा डाव सुरु असल्याचा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला. काल (18 जुलै) मीरा-रोडमध्ये राज ठाकरेंनी सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

Continues below advertisement


तुमची भाषा आणि तुमची जमीन गेली तर तुम्हाला अर्थ नाही, कोणी विचारणार नाही, तुमची भाषा टिकवणे गरजेचे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मी पंतप्रधान यांना सांगितले होते, मराठीला दर्जा द्या, दर्जा दिला पण पैसे नाही आले, अशी टीका राज ठाकरेंनी केली. हिंदी भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नडला, याबाबत आश्चर्य वाटते, असा निशाणा राज ठाकरेंनी साधला. माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत त्यापेक्षा माझे हिंदी बरे आहे, याचे कारण माझे वडील, माझ्या वहिलांना उत्तम मराठी हिंदी उर्दू येत होते. भाषा कधीच वाईट नसते, पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार, लहान मुलांवर तर नाहीच, असं राज ठाकरेंनी सांगितलं. 


...तर युती होणारच; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले-


तुमची सत्ता लोकसभा आणि विधानसभेत आमची सत्ता रस्त्यावर असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसेच 56 इंचाची तुम्ही पण छाती काढून फिरा...परत जर कोणी बोलला तर त्याचा गाल आणि यांचा हात यांची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. कोणाची मैत्री असो की काही असो मराठी बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही, आधी पण नाही ,आताही नाही पुढेही नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेनमध्ये कायमस्वरूपी तुम्ही मराठीत बोला, असं आवाहन देखील राज ठाकरेंनी केलं.  



दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु...त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो...दुबे..तुम मुंबई में आ जावो.. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे..., असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं.




संबंधित बातमी:


Raj Thackeray : राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर करावी, राज ठाकरेंचा हिंदी सक्तीवरुन देवेंद्र फडणवीसांवर पलटवार अन् चॅलेंज