Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत .  काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे सहकुटुंब  राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते . शिवतीर्थवरून उद्धव ठाकरे बाहेर पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला जाणार आहेत .

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर बुधवारी (21 ऑगस्ट) राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती .  या भेटीदरम्यान जवळपास 3/4 तास चर्चा झाली .त्यानंतर आठवड्याभरातच मुख्यमंत्री फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही दुसरी भेट असेल. 

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अलीकडे झालेल्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा दोघांची भेट होणार आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. आज मुख्यमंत्री फडणवीस गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचणार आहेत. काही वेळापूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. शिवतीर्थवरून उद्धव ठाकरे बाहेर पडताच मुख्यमंत्री फडणवीस तेथे पोहोचतील. उद्धव ठाकरे दुपारी 12.25 वाजता राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले होते. तब्बल दोन तास भेटीनंतर ते साधारण 2.25 च्या सुमारास शिवतीर्थवरून निघाले. आता फडणवीसांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण येणार आहे.

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन

उद्धव ठाकरे हे आज सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या नव्या घरी गेले होते. यापूर्वी सार्वजनिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक सोहळ्यातच एकत्र येताना दिसत होते. मात्र, आज गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे हे संपूर्ण ठाकरे कुटुंब घरात एकत्र आले. राज ठाकरे यांच्या घरी भोजन करुन उद्धव ठाकरे पुन्हा मातोश्रीकडे रवाना झाले. यानंतर आता देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येणार आहेत. उद्धव ठाकरे हे राज यांच्या घरी गेल्याने ठाकरे बंधूंमध्ये मनोमीलन झाले, अशी चर्चा होती.  मात्र, आता देवेंद्र फडणवीसही राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.